‘गडकोटांच्या संवर्धनासाठी तीन महिन्यात स्वतंत्र महामंडळ’

‘गडकोटांच्या संवर्धनासाठी तीन महिन्यात स्वतंत्र महामंडळ’

पुणे, ता. ७ : गेल्या अनेक वर्षांपासून समस्त हिंदू बांधव समिती, सामाजिक संस्थांच्या वतीने गडकोट, किल्ल्यांच्या संवर्धनासाठी स्वतंत्र महामंडळ स्थापनेची मागणी करण्यात येत आहे. दरम्‍यान, याची दखल घेत राज्याचे मुख्‍यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि पर्यटनमंत्री मंगलप्रभात लोढा यांनी येत्या तीन महिन्यात गड-किल्ल्यांच्या संवर्धनासाठी स्वतंत्र महामंडळ स्थापन करण्याचे आश्र्वासन दिले आहे, अशी माहिती हिंदू बांधव समितीचे संस्थापक अध्यक्ष रवींद्र पडवळ यांनी पत्रकार परिषदेत दिली.
या प्रसंगी महिला अध्यक्ष ऋतुजा माने आणि सचिव हनुमंत तपसे उपस्थित होते.
पडवळ म्हणाले, ‘‘पुरातत्त्व विभागानुसार ३१ गडकिल्ल्यांचे सर्वेक्षण झाले आहे. मात्र राज्यात ४००हून अधिक गडकोट असून अद्याप त्यांचे सर्वेक्षण झाले नाही. तसेच हे सर्वेक्षण महामंडळ अंतर्गत होईल. तर महामंडळ स्थापनेमुळे गडकिल्ल्यांची जिल्हानिहाय यादी तयार केली जाईल, पर्यटनात वाढ होईल, यामुळे गड-किल्ल्यातील परिसरात रोजगार निर्मिती, गडावर तातडीची आरोग्यसेवा मिळेल, किल्ल्यांच्या इतिहासाबाबत लोकांमध्ये जनजागृती आदी फायदे होणार असून सर्व किल्यांचे नकाशे तयार होऊन संवर्धन सोपे होईल.
या महामंडळात इतिहास, दुर्गविज्ञान आणि त्याच्याशी संलग्न असणाऱ्या विषयातील तज्ज्ञ असतील. त्याचप्रमाणे काही सरकारी अधिकारी आणि गड संवर्धन करणाऱ्या संघटनांचा यात समावेश असेल.’’

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com