Thur, June 1, 2023

तन्मयी मेहेंदळे यांना ‘साहित्यसुमति २०२३’ पुरस्कार
तन्मयी मेहेंदळे यांना ‘साहित्यसुमति २०२३’ पुरस्कार
Published on : 7 March 2023, 12:56 pm
पुणे, ता. ७ : जागतिक महिला दिनानिमित्त नारदीय कीर्तन, संगीत व साहित्य क्षेत्रातील लेखिका, कवयित्री तन्मयी मेहेंदळे यांना ‘साहित्यसुमति २०२३’ पुरस्कार प्रदान करण्यात आला. ज्येष्ठ नेते उल्हास पवार यांच्या हस्ते ‘नाद संवाद’ आणि ‘तन्मयता’ या पुस्तकांसाठी हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. ऋतुरंग पुणे तर्फे सन्मान ‘स्त्री’चा हा पुरस्कार त्यांना मिळाला आहे. मेहेंदळे यांचे पहिले पुस्तक नाद संवाद हे प्रविण वाळिंबे यांनी प्रकाशित केले आहे. तर ‘तन्मयता’ काव्यसंग्रहाच्या प्रकाशिका शब्दाली काळे आहेत.