Wed, May 31, 2023

प्रवास स्वाभिमानाने सुरू
प्रवास स्वाभिमानाने सुरू
Published on : 7 March 2023, 2:29 am
विज्ञान- तंत्रज्ञान, आयटी, बॅंकिंग, प्रशासन, कला-क्रीडा, उद्योग आदी विविध क्षेत्रांत महिलांनी मोठी भरारी घेतल्याची अनेक उदाहरणे आपल्या आजूबाजूला आहेत. परंतु, घराबाहेर पाऊल टाकल्यावर सार्वजनिक सुविधांसाठी महिलांना अजूनही संघर्ष करावा लागत आहे. मात्र, काही ठिकाणी बदल होत असले तरी, अजूनही मोठा टप्पा गाठायचा आहे. दुसरीकडे प्रवास खडतर असला तरी, त्याची पर्वा न करता कष्टकरी महिला स्वतःची वाट स्वतः निर्माण करताना दिसतात. त्यावरून त्यांचा प्रवास स्वाभिमानाने सुरू असल्याचे जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने ‘सकाळ’ने घेतलेल्या आढाव्यातून दिसून आले.