Wed, June 7, 2023

आंबेगाव पठार भागातील
पाणी पुरवठा गुरुवारी बंद
आंबेगाव पठार भागातील पाणी पुरवठा गुरुवारी बंद
Published on : 7 March 2023, 3:43 am
पुणे, ता. ७ ः तळजाई टाकीवरून आंबेगाव पठार भागाला पाणी पुरवठा करणाऱ्या जलवाहिनीच्या दुरुस्तीचे काम महापालिकेच्या पाणी पुरवठा विभागाकडून केले जाणार आहे. त्यामुळे आंबेगाव पठार येथील सर्व्हे क्रमांक १७ ते ४० या भागातील पाणी पुरवठा गुरुवारी (ता. ९) बंद राहणार आहे. तर दुसऱ्या दिवशी कमी दाबाने पाणी पुरवठा केला जाणार आहे. त्यादृष्टीने नागरिकांनी पाण्याचे नियोजन करावे, असे आवाहन पाणी पुरवठा विभागाकडून करण्यात आले आहे.