Mon, May 29, 2023

मार्केट यार्डमधील जुगार अड्ड्यावर छापा
मार्केट यार्डमधील जुगार अड्ड्यावर छापा
Published on : 7 March 2023, 5:13 am
पुणे, ता. ७ : मार्केट यार्ड येथील भाजी मंडई परिसरात सुरू असलेल्या मटका जुगार अड्ड्यावर पोलिसांनी छापा टाकून ११ जणांना ताब्यात घेतले. गुन्हे शाखेच्या सामाजिक सुरक्षा विभागाने ६ मार्च रोजी ही कारवाई केली.
पोलिसांनी मटका जुगाराचे साहित्य आणि रोख रक्कम असा सुमारे १७ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. याबाबत मार्केट यार्ड पोलिस ठाण्यात ११ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.