चला, लागा तयारीला! | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

चला, लागा तयारीला!
चला, लागा तयारीला!

चला, लागा तयारीला!

sakal_logo
By

पुणे, ता. ८ ः पुणे महापालिकेने २०२२ मध्ये ४४८ पदांची भरती प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर आता २०२३ मध्ये ३२० पदांची भरती प्रक्रिया सुरू केली आहे. यामध्ये वर्ग एकच्या आठ, वर्ग दोनमधील २३, वर्ग तीनमधील २८९ जागांचा समावेश आहे. या पदभरतीसाठी अर्ज भरण्यास बुधवारपासून (ता. ८) सुरवात झाली असून, २८ मार्चपर्यंत अखेरची मुदत आहे. या सरळसेवा भरतीसाठी एप्रिल किंवा मे महिन्यात ऑनलाइन परीक्षा होणार आहे.
पुणे महापालिकेत २०१२ पासून पदभरती झालेली नसल्याने अनेक पद रिक्त आहेत. त्याचा परिणाम कामकाजावर होत आहे. वर्ग तीनचे कर्मचारी कंत्राटी पद्धतीने भरती केले जात आहेत. पण हे कर्मचारी पुरेसे नाहीत, तसेच कनिष्ठ पदांवर काम करण्यासाठी कायमस्वरूपी कर्मचारी नाहीत, त्यामुळे जुने कर्मचारी पदोन्नतीने वरच्या पदावर गेल्यानंतर त्या जागा रिक्तच राहत आहेत. त्यामुळे प्रशासकीय कामात गोंधळ निर्माण होत आहे. पुणे महापालिकेने २०२२ मध्ये राबविलेल्या भरतीमध्ये कनिष्ठ अभियंता स्थापत्य, यांत्रिकी आणि वाहतूक नियोजन, सहायक अतिक्रमण निरीक्षक, लिपिक, सहायक विधी सल्लागार या पदांची भरती केली. दुसऱ्या टप्प्यात आरोग्य सेवेतील व अग्निशामक दलाच्या भरतीला प्राधान्य दिले आहे. या भारतीची सविस्तर माहिती https://www.pmc.gov.in/recruitment/recruitmentmr.html या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.

या ११ पदांची भरती (उपलब्ध जागा)
- क्ष किरण तज्ज्ञ (८)
- वैद्यकीय अधिकारी (२०)
- प्राणी संग्रहालय उप संचालक (१)
- पशू वैद्यकीय अधिकारी (२)
- वरिष्ठ आरोग्य निरीक्षक (२०)
- आरोग्य निरीक्षक (४०)
- कनिष्ठ अभियंता (विद्युत) (१०)
- वाहन निरिक्षक (३)
- मिश्रक/औषध निर्माता (१५)
- पशुधन पर्यवेक्षक (१)
- अग्निशामक विमोचक (२००)

हे लक्षात ठेवा
- ऑनलाइन पद्धतीने अर्ज नोंदणीची मुदत - ८ मार्च ते २८ मार्च २०२३ (रात्री ११.५९ वाजेपर्यंत)
- परीक्षा शुल्क - खुला वर्ग एक हजार रुपये, मागासवर्ग - ९००
- ऑनलाइन परीक्षेसाठी गुण - २००
- परीक्षेसाठी ऑनलाइन प्रवेशपत्र होण्याची तारीख - परीक्षेआधी सात दिवस
- परीक्षा कधी होणार - एप्रिल किंवा मे महिन्यात
- परीक्षेचा निकाल कधी जाहीर होणार - ऑनलाइन परीक्षा झाल्यानंतर पुढील एक ते दोन आठवड्यात गुणवत्ता यादी जाहीर
- कागदपत्र पडताळणी - गुणवत्ता यादीतील पात्र व प्राधान्य क्रमाने उमेदवारांना कागदपत्र पडताळणीसाठी बोलविले जाणार, त्यानंतर निवड यादी जाहीर होणार

असा असणार सुरवातीचा पगार (यामध्ये भत्त्याचा समावेश नाही)
- क्ष किरण तज्ज्ञ - ६७७००
- वैद्यकीय अधिकारी - ५६१००
- प्राणी संग्रहालय उप संचालक -४९१००
- पशू वैद्यकीय अधिकारी - ४१८००
- वरिष्ठ आरोग्य निरीक्षक - ४१८००
- आरोग्य निरीक्षक - ३५४००
- कनिष्ठ अभियंता (विद्युत) - ३८६००
- वाहन निरिक्षक - ३५४००
- मिश्रक/औषध निर्माता - २९२००
- पशुधन पर्यवेक्षक - २५५००
- अग्निशामक विमोचक - १९९००

पुणे महापालिकेमध्ये आरोग्य सेवा, उद्यान विभाग, वाहन विभाग
आणि अग्निशामक दलातील रिक्त पदांची भरती प्रक्रिया सुरू केली आह. ऑनलाइन पद्धतीने परीक्षा होऊन पात्र उमेदवारांची कागदपत्र पडताळणी करून निवड केली जाईल. ही भरती प्रक्रिया पारदर्शकपणे केली जाणार आहे. अफवा व एजंटावर विश्‍वास ठेवू नये.
- सचिन इथापे, उपायुक्‍त, सामान्य प्रशासन विभाग