
जाणून घ्या अन्नप्रक्रियेतील महत्वाचे ''फ्रोजन तंत्रज्ञान''
पुणे, ता. ८ ः फळे-भाजीपाल्याची टिकवण आणि साठवण क्षमता वाढविण्यात अन्नप्रक्रियेत फ्रोजन तंत्रज्ञान महत्त्वाचे आहे. हे तंत्रज्ञान समजून यात छोट्या स्तरावरील स्टार्टअप उद्योग विशेषतः फूड टेक्नॉलॉजी विषयातील विद्यार्थी तसेच ज्यांनी प्रक्रिया उद्योग नव्याने सुरू केला आहे, अशांसाठी भरपूर वाव आहे. याविषयी सविस्तर मार्गदर्शन करणारा २ दिवसीय विकेंड सर्टिफिकेट कोर्स शनिवारी (ता. ११) आणि रविवारी( १२) सकाळ व ॲग्रोवन संलग्न शैक्षणिक संस्था ‘एसआयआयएलसी’च्या वतीने होणार आहे. यात फ्रोजन तंत्रज्ञानाची ओळख, त्याचा वापर कसा करतात, या व्यवसायातील संधी इत्यादींबाबत टर्नकी प्रोजेक्ट व फूड प्रोसेसिंग विषयातील सल्लागार तज्ज्ञ मार्गदर्शन करतील. प्रतिव्यक्ती ४ हजार रुपये (चहा, जेवण, प्रशिक्षण साहित्य, प्रमाणपत्रासह) शुल्क आहे. कार्यशाळेचे ठिकाण ः सकाळनगर, बाणेर रोड, गेट नं. १, औंध, पुणे, वेळ सकाळी साडेदहा ते संध्याकाळी पाच, अधिक माहिती व नावनोंदणीसाठी संपर्क ः ९१४६०३८०३१
कोर्समधील विषय
- फ्रोजन प्रक्रिया युनिट कसे सुरू करावे
-आवश्यक पायाभूत सुविधा
-पोजेक्ट प्लॅनिंग व मॅनेजमेंट
-स्थानिक व निर्यात बाजारपेठ
-फळे-भाजीपाला रेडी टू कूक, रेडी टू इट फ्रोजन प्रक्रिया
-आवश्यक मशिनरी
- पॅकेजिंग व लेबलिंग
- स्टॅच्युटरी व रेग्युलेटरी रिक्वायरमेंट