संगणक माहितीशास्त्रावर कार्याशाळा

संगणक माहितीशास्त्रावर कार्याशाळा

पुणे, ता. ८ ः ‘एआयएसएसएमएस’च्या ‘आयओआयटी’ महाविद्यालयात  ‘इमर्जिंग स्मार्ट कंप्युटिंग अँड इन्फॉरमेटिक्स-ईएससीआय -२०२३’ या विषयावरील पाचवी आंतरराष्ट्रीय परिषद उत्साहात झाली. परिषदेचे उद्‍घाटन पद्मश्री आणि इंडियन इन्सिट्यूट ऑफ सायन्स एज्युकेशन अँड रिसर्चचे (आयसर) संस्थापक संचालक प्रा. के. एन. गणेश तिरुपती यांच्या हस्ते ऑनलाइन माध्यमातून झाले. प्रा. के. एन. गणेश यांनी आपल्या भाषणादरम्यान  नावीन्यपूर्ण विषयांवर   आंतरराष्ट्रीय   परिषद आयोजित केल्याबद्दल ‘एआयएसएसएमएस’चे त्यांनी अभिनंदन केले. परिषदेदरम्यान वक्ते डॉ. एकार्त बुंचेंग, डॉ. शिवेन माओ, प्रा. ब्रुनो लॉरेन्सिच, डॉ. जेरीगाओ, डॉ. मार्को डी रेन्झो यांचे सत्र झाले. ज्ञान सामायीकरण, नावीन्यपूर्ण कल्पनांविषयी ज्ञानाची देवाण-घेवाण करण्यासाठी व इंडस्ट्रीमधील नवनवीन ट्रेंड्स समजावून घेण्यासाठी परिषदेच्या अनुषंगाने प्री-कॉन्फरन्स ट्यूटोरियल सत्रांचे आयोजन करण्यात आले होते. त्यात आनंद निजामपूरकर, पराग दांडेकर, डॉ. योगेश करपटे, महेश बालशेटवार, डॉ. श्रीपर्णा शहा, गजानन बेजगवार यांनी मार्गदर्शन केले. ही परिषद एआयएसएसएम सोसायटीचे सचिव मालोजीराजे छत्रपती यांच्या मार्गदर्शनाखाली झाली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com