Mon, June 5, 2023

कागदी पिशव्या बनवण्याचा उपक्रम
कागदी पिशव्या बनवण्याचा उपक्रम
Published on : 8 March 2023, 10:43 am
पुणे, ता. ८ ः जागतिक महिलादिनाच्या निमित्ताने अप्पा बळवंत चौकातील नू. म. वि. शिशुशाळा येथे स्त्री पालकांसाठी कागदी पिशव्या बनवण्याचा उपक्रम घेण्यात आला. आजच्या धकाधकीच्या जीवनात महिला स्वतःच्या आरोग्याकडे फारसे लक्ष देत नाहीत. त्यासाठी सेवा सहयोग संस्थेच्या योगिनी सोनपाटकी यांचे ‘महिलांचे आरोग्य व व्यायामाचे महत्त्व’ याविषयी चर्चासत्र झाले. पालकांनी या उपक्रमात उत्साहाने सहभाग घेतला. मुख्याध्यापक दीपा कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम झाला.