
देसर्डा, नालट यांना युवा साहित्य पुरस्कार
पुणे, ता. ८ ः यशवंतराव चव्हाण सेंटरच्या २०२२ साठीच्या ‘यशवंतराव चव्हाण राज्यस्तरीय युवा साहित्य पुरस्कारा’साठी पुण्याच्या अमृता देसर्डा आणि अमरावतीच्या पवन नालट यांची निवड झाली आहे. एकवीस हजार रुपये आणि सन्मानचिन्ह असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.
अमृता देसर्डा यांच्या सारद मजकूर प्रकाशित ‘आत आत आत’ या कथासंग्रहाला तर पवन नालट यांच्या राजहंस प्रकाशन प्रकाशित ‘मी संदर्भ पोखरतोय’ या पुस्तकाची या पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे.
यशवंतराव चव्हाण सेंटरच्या वतीने दरवर्षी साहित्य, सामाजिक, क्रीडा, उद्योजकता, रंगमंचीय कलाविष्कार, पत्रकारिता आणि इनोव्हेशन या क्षेत्रातील गुणवंत युवकांना ‘यशवंतराव चव्हाण राज्यस्तरीय युवा पुरस्कार’ दिला जातो. त्याचे वितरण यशवंतराव चव्हाण यांच्या जयंतीदिनी १२ मार्च रोजी सकाळी ११ वाजता मुंबईतील रंगस्वर सभागृह, यशवंतराव चव्हाण सेंटर, मुंबई येथे सेंटरच्या कार्याध्यक्षा खासदार सुप्रिया सुळे यांच्या हस्ते प्रदान करण्यात येणार आहे.