लोकसहभागातून तणहोळी साजरी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

लोकसहभागातून तणहोळी साजरी
लोकसहभागातून तणहोळी साजरी

लोकसहभागातून तणहोळी साजरी

sakal_logo
By

पुणे, ता. ८ ः हुताशनी पौर्णिमा अर्थात होळीचे औचित्य साधून प्रतीकात्मक उपद्रवी परदेशी तणाची ‘तण-होळी’चे आयोजन करण्यात आले होते.
मूव्हमेंट अगेंस्ट बायोलॉजिकल इनव्हेजन (माबि) या हरित चळवळीअंतर्गत बायोस्फिअर्स संस्था, मॉडर्न महाविद्यालय आणि कॉम्पिटेटर्स फाउंडेशन यांच्या वतीने ‘उपद्रवी परदेशी तणाबाबत योग्य ती जनजागृती व पर्यावरणीय साक्षरता यावी,’ या हेतूने ऐतिहासिक गणेश खिंड येथे मॉडर्न महाविद्यालय प्रांगणात भव्य-आयोजन करण्यात आले होते.
बायोस्फिअर्स संस्थेच्या पुढाकारातून तण-होळी गेली सात वर्षे सातत्याने साजरी होत आहे. तण-होळीच्या माध्यमातून जनमानसात परकीय उपद्रवी वनस्पती व इतर जैविक घटकांबाबतचा जागर भारतभर सर्वदूर होत आहे.
तण-होळीमध्ये रानमारी, टणटणी (घाणेरी), उंदीरमारी (ग्लीरीसीडीया), सुबाभूळ (खरतर कुबाभूळ), ऑस्ट्रेलियन बाभूळ, एरंड, कॉसमॉस (सोन कुसुम), हिपटीस, धनुरा (गाजर गवत किंवा चटक चांदणी), चिमुक काटा, टेकोमा, जलपर्णी, जलकुंभी या उपद्रवी तणांना जाळण्यात आले.
या वेळी पी. ई. सोसायटीचे उपकार्यवाह प्रा. सुरेश तोडकर, सहकार्यवाह डॉ. प्रकाश दीक्षित, मॉडर्न महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. संजय खरात, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ भूगोल विभागाचे माजी विभागप्रमुख डॉ. रवींद्र जायभाये, मुळा शिक्षण संस्थेच्या सोनाई कॉलेजचे प्राचार्य डॉ. शंकर लावरे, बायोस्फिअर्स संस्थेचे अध्यक्ष डॉ. सचिन अनिल पुणेकर, आदी उपस्थित होते.