दुचाकीस्वाराची ‘रिल्स’च्या नादात महिलेला धडक | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

दुचाकीस्वाराची ‘रिल्स’च्या 
नादात महिलेला धडक
दुचाकीस्वाराची ‘रिल्स’च्या नादात महिलेला धडक

दुचाकीस्वाराची ‘रिल्स’च्या नादात महिलेला धडक

sakal_logo
By

पुणे, ता. ८ : समाजमाध्यमासाठी व्हिडिओ ‘रिल्स’ बनविताना दुचाकीस्वाराने एका महिलेला धडक दिल्याचा प्रकार घडला. या अपघातात महिलेचा मृत्यू झाल्याची घटना महम्मदवाडी येथील कृष्णानगरमध्ये घडली. तस्लिम फिरोज पठाण (रा. युसूफ पार्क, आदर्शनगर, उरुळी देवाची) असे अपघातात मृत्यू झालेल्या महिलेचे नाव आहे. त्या मूळच्या बार्शी तालुक्यातील गाडेगाव येथील रहिवासी आहेत.

अपघातानंतर दुचाकीस्वार आणि त्याचा मित्र हे दोघे पसार झाले, परंतु वानवडी पोलिसांनी दुचाकीस्वारासह दोघांना अटक केली. आयान शहानूर शेख आणि झाईद जावेद शेख (दोघे रा. सय्यदनगर, हडपसर) अशी अटकेतील आरोपींची नावे आहेत. याप्रकरणी पोलिस हवालदार ज्योतिबा कुरळे यांनी फिर्याद दिली. आरोपी आयान आणि झाईद हे दोघे कृष्णानगर परिसरात भरधाव दुचाकीवर रिल्स तयार करत होते. दुचाकीस्वार आयान हा भरधाव वेगाने दुचाकी चालवित होता. तर, झाईद मोबाईलवर चित्रीकरण करत होता. त्यावेळी दुचाकीस्वाराने पायी जात असलेल्या तस्लिम यांना धडक दिली. त्यात गंभीर जखमी झाल्यामुळे तस्लिम यांचा मृत्यू झाला.