कात्रज ते रायगड २३ तास ५० मिनिटांत

कात्रज ते रायगड २३ तास ५० मिनिटांत

पुणे, ता. ८ ः गिर्यारोहक कै. अरुण सावंत यांच्या प्रेरणादायी स्मृतीस अभिवादन करण्यासाठी सहा शिवप्रेमींनी कात्रज घाट ते रायगड हे ८० किलोमीटरचे अंतर २३ तास ५० मिनिटांत नुकतेच पूर्ण केले. हे संपूर्ण अंतर डोंगर दऱ्यांतून धावत सहाही युवकांनी पार केले.
ही मोहीम सायंकाळी ४ च्या सुमारास सुरू झाली आणि दुसऱ्या दिवशी दुपारी ३ वाजून ५० मिनिटांनी तिची सांगता झाली. या मोहिमेचे नेतृत्व करणारा सूरज मालुसरे यांनी अवघ्या २३ तास ५० मिनिटांत ही मोहीम पूर्ण करीत प्रथम क्रमांक मिळविला. त्यामागोमाग रूपेश तन्वर याने (२३ तास ५४ मिनिटे) तसेच गणेश भिंताड (२३ तास ५७ मिनिटे), सचिन मदने (२४ तास ३५ मिनिटे), डॉ. आशिष मेरुरकर (२४ तास ३५ मिनिटे), सिदगोंडा पाटील (२५ तास १५ मिनिटे) यांनी रायगडावरील सदरेवर भगवा झेंडा फडकावत मोहीम यशस्वीरीत्या पूर्ण केली. अजित गोरे या युवकाने राजगडपर्यंत तसेच संजय शेळके याने रायगडावरील चित् दरवाज्यापर्यंत ही मोहीम पूर्ण केली.


चार महिने पळण्याचा सराव
या सहा युवकांनी चार महिने सातत्याने पळण्याचा सराव करून जुन्या कात्रज घाटाच्या माथ्यावर असलेल्या वाघजाई मंदिर या स्थळापासून आरंभ केला. १७ टेकड्या पार करत सिंहगड येथून कल्याण दरवाजामार्गे विंझर, मेरावणे ते फणशीमार्गे राजगड, पुढे त्यांनी तोरणा किल्ल्यावरील बुधला माची, चित् दरवाजा मार्गे गेळगणी, ब्राह्मण पाडा, मोहरी गाव तेथून कोकणात उतरणारी प्राचीन घाटवाट म्हणजेच सिंगापूर नाळ ते दापोली आणि वाघिरे गावामार्गे रायगडवाडी आणि तेथून नाना दरवाजामार्गे अखेरच्या रायगडावरील सुमारे १४०० पायऱ्या चढत छत्रपतींच्या सदरेवर असलेल्या सिंहासनासमोर नतमस्तक होऊन या युवकांनी मोहीम पूर्ण केली. या मोहिमेसाठी सपोर्ट टिममध्ये सागर अमराळे, गिरीश बर्वे आणि नचिकेत जोशी यांचा सहभाग होता.

पुणे ः कात्रज घाट ते रायगड हे ८० किलोमीटरचे अंतर सुमारे २४ तासांत धावत पूर्ण करून सहा युवकांनी गिर्यारोहक अरुण सावंत यांना श्रद्धांजली अर्पण केली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com