पावसाचे सावट होणार दूर

पावसाचे सावट होणार दूर

पुणे, ता. ८ ः पुणे शहरात सोमवारपासून (ता. ६) ढगाळ हवामान, विजांचा कडकडाट आणि तुरळक ठिकाणी असलेले पावसाचे सावट आत काहीसे दूर होण्याची शक्यता आहे. गुरुवारपासून (ता. ९) आकाश मुख्यतः निरभ्र राहील, असा अंदाज हवामान खात्याने वर्तविला आहे.
अरबी समुद्रात तयार झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे शहरात दोन दिवस ढगाळ हवामान होते. गोव्यापासून अंतर्गत कर्नाटक, तेलंगण, विदर्भ आणि मध्य छत्तीसगडपर्यंत समुद्र सपाटीपासून १.५ किलोमीटर उंचीपर्यंत हवेचा कमी दाबाचा पट्टा सक्रिय होता. तसेच नैॡत्य राजस्थान परिसरावर चक्राकार वारे वाहत असल्याने राज्यात वादळी पावसाला पोषक हवामान होते. आता मात्र राज्यातील अवकाळी पावसाचे सावट दूर झाले आहे. ढगाळ हवामान आणि थंड वाऱ्यांमुळे शहरातील कमाल तापमानात काहीशी घट झाली होती, तर पहाटेच्या वेळी थंडी जाणवत होती. बुधवारी पुणे शहरातील सरासरी किमान तापमान १३.२ अंश सेल्सिअस नोंदविले गेले, तर कमाल तापमानाचा पाराही ३३ अंशांवर होता. निरभ्र आकाश आणि कोरड्या हवामानामुळे शहरात उन्हाचा चटका पुन्हा एकदा वाढण्याची शक्यता आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com