‘तेजस्विनी’मधून सात हजार
महिलांचा मोफत प्रवास

‘तेजस्विनी’मधून सात हजार महिलांचा मोफत प्रवास

पुणे, ता. ८ ः जागतिक महिला दिनानिमित्त बुधवारी पीएमपीएमएलच्या ‘तेजस्विनी’ बसमधून सुमारे सात हजार महिलांनी मोफत प्रवास केला. पीएमपी प्रशासनाने नुकतीच ही सेवा पुर्ववत केली आहे. आता दर महिन्याच्या आठ तारखेला ‘तेजस्विनी’ बसमधून महिलांना मोफत बस प्रवास करता येणार आहे.
पीएमपी प्रशासनाने बुधवारी ‘तेजस्विनी’च्या २८ बसेसने २३ मार्गावर सेवा दिली. यातून दिवसभरात सहा हजार ८९० महिलांनी प्रवास केला. महिला प्रवाशांची संख्या वाढावी, यासाठी पीएमपी प्रशासन प्रयत्न करीत आहे. हा त्याचाच भाग आहे. २०१९ मध्ये पीएमपीच्या संचालक मंडळाच्या बैठकीमध्ये महिला दिनानिमित्त आणि दर महिन्याच्या ८ तारखेस महिलांना तेजस्विनी बसमध्ये मोफत बस सेवेस मंजुरी दिली होती. मात्र, कोविडमुळे आणि महिला प्रवाशांचा अल्प प्रतिसाद असल्याने ही सेवा बंद करण्यात आली. आता बुधवारपासून ती सेवा पूर्ववत झाली आहे.

तेजस्विनी बसला महिलांचा चांगला प्रतिसाद मिळाला आहे. सुमारे सात हजार प्रवाशांनी याचा लाभ घेतला. दर महिन्याच्या आठ तारखेला ही सेवा केवळ महिलांसाठी देण्यात येईल.
- सतीश गव्हाने, मुख्य वाहतूक व्यवस्थापक, पीएमपीएमएल.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com