‘रिलायन्स फाउंडेशन’तर्फे महिलांसाठी विशेष व्यासपीठ | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

‘रिलायन्स फाउंडेशन’तर्फे 
महिलांसाठी विशेष व्यासपीठ
‘रिलायन्स फाउंडेशन’तर्फे महिलांसाठी विशेष व्यासपीठ

‘रिलायन्स फाउंडेशन’तर्फे महिलांसाठी विशेष व्यासपीठ

sakal_logo
By

मुंबई, ता. ९ ः जागतिक महिला दिनानिमित्त रिलायन्स फाउंडेशनच्या संस्थापक अध्यक्षा नीता अंबानी यांनी ‘हर सर्कल, एव्हरीबडी’ या व्यासपीठाची घोषणा केली. महिलांना त्यांची जात, धर्म, वय, रंग, शारीरिक स्थिती यांचा विचार करता स्वीकारले जावे व शरीराची सकारात्मकता साजरी व्हावी हा व्यासपीठाचा उद्देश आहे.
याआधी २०२१ मध्ये ‘हर सर्कल’ या व्यासपीठाची सुरवात करण्यात आली होती व त्याअंतर्गत तब्बल ३१ कोटी महिलांचा सुरक्षित व सर्वसमावेशक विकास होण्यासाठी प्रयत्न झाले. या व्यासपीठाचा उद्देश सर्वसमावेशक होता व नव्या व्यासपीठाचा तोच गाभा असेल. या व्यासपीठात सर्वांनी सहभागी होऊन नव्या बदलाची सुरवात करावी, अशी अपेक्षा अंबानी यांनी व्यक्त केली. याविषयी बोलताना अंबानी म्हणाल्या, ‘‘सोशल मीडियाच्या माध्यमातून महिलांचे ट्रोलिंग होते व त्यांना अपमानास्पद वागणूक दिली जाते. याचा तरुण मुलांच्या मानसिकतेवर विपरीत परिणाम होतो. आमचे व्यासपीठ या प्रश्‍नावर काम करेल व महिलांना स्वातंत्र्य व जगण्यासाठी आत्मविश्‍वास मिळवून देईल.’’