मूत्रपिंडाच्या आरोग्यासाठी ‘वॉकेथॉन’

मूत्रपिंडाच्या आरोग्यासाठी ‘वॉकेथॉन’

पुणे, ता. १० : मूत्रपिंडाच्‍या वाढत्‍या समस्‍यांबाबत जनजागृती करण्‍यासाठी बाणेर येथील मणिपाल रुग्णालयातर्फे वॉकेथॉनचे आयोजन करण्यात आले होते. यात डायलिसिसवरील रुग्‍णांसह डॉक्‍टर सहभागी झाले होते. या निमित्ताने मूत्रपिंड विकार तज्ज्ञ डॉ. तरुण जेलोका यांनी मूत्रपिंडाचे आरोग्य चांगले ठेवण्याबाबत मार्गदर्शन केले. या वेळी हेल्‍थकेअर प्रीव्‍हीलेज मेम्‍बरशीप उपक्रम ‘सुरक्षा कार्ड’ची देखील घोषणा केली.
डॉ. जेलोका म्‍हणाले, ‘‘जागतिक मूत्रपिंड दिनाच्‍या यंदाची संकल्पना मूत्रपिंडाच्‍या आरोग्‍याला धोका असलेल्‍या अनपेक्षित नैसर्गिक व मानव-निर्मित आपत्तींकरिता सुसज्‍ज असण्‍याचा प्रस्‍ताव सादर केला आहे. अगदी विकसित देशांमध्‍ये देखील हे आव्‍हान असल्याचे कोरोना उद्रेकामध्ये पाहायला मिळाले. भविष्यातील अशा आपत्तींसाठी मुकाबला करण्यासाठी सज्ज राहण्याची गरज आहे.’’
रुग्णालयाच्या संचालिका डॉ. विजू राजन म्‍हणाल्‍या, ‘‘विविध वयोगटातील व्‍यक्‍तींमध्‍ये मूत्रपिंड निकामी होणे यासारख्‍या समस्‍या वाढत आहेत. बहुतांश रुग्णांमध्‍ये अयोग्‍य जीवनशैली हे सर्वांत सामान्‍य कारण आहे. ज्‍याचा इतर प्रमुख अवयवांवर देखील परिणाम होतो. या वॉकेथॉनच्‍या साहाय्याने आमचा मूत्रपिंडांशी संबंधित समस्‍यांसाठी लवकर निदान, जीवनशैलीमध्‍ये बदल आणि वेळेवर सल्‍लामसलतीच्‍या महत्त्वाबाबत अधिक जागरूकता निर्माण करण्‍याचा मनसुबा आहे. मूत्रपिंडाच्‍या समस्येमुळे स्वतः डायलिसिसवर असलेल्या सहभागी व्यक्तींचा उत्साह पाहणे कौतुकास्पद होते.’’

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com