महिला दिन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

महिला दिन
महिला दिन

महिला दिन

sakal_logo
By

फॉर्च्युन सोसायटीमध्‍ये सन्मान
पुणे, ता. ९ : हडपसर येथील फॉर्च्युन इस्टेट सोसायटीमध्ये जागतिक महिला दिनानिमित्त आयोजित ‘आरोग्य विषयक समस्या आणि त्यावरील उपाय’ याविषयी डॉ. ऐश्वर्या बोंगाणे यांनी महिलांना मार्गदर्शन केले. या प्रसंगी सोसायटीमध्ये साफसफाई व स्वच्छतेचे काम करणाऱ्या पुष्पा गोसावी, जगूबाई वागे आणि जानकी बिस्ता या सफाई कर्मचाऱ्यांचा सन्मान करण्यात आला. या वेळी एमआयटीच्या मंजुलता वर्मा, सुनीता देशमुख, सोनल राऊत, अजित राऊत, अमोल लढ्ढा आदी उपस्थित होते. प्राध्यापिका दीपिका लढ्ढा यांनी सूत्रसंचालन केले तर ज्ञानेश्वर हेडाऊ यांनी आभार मानले.

क्रिप्स फाउंडेशनतर्फे सत्कार
पुणे, ता. ९ : क्रिप्स फाउंडेशनच्या वतीने मराठा चेंबर्स ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीज येथील सुमंत मुळगावकर सभागृहात महिला दिवस साजरा करण्यात आला. या वेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्‍थानी महिला उद्योजिका व ‘कृष्णा डायग्नोस्टिक्स’च्या अध्यक्षा पल्लवी जैन होत्या. त्यांच्या हस्ते विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या महिलांचा सत्‍कार करण्यात आला. यामध्‍ये आरती पाटील, आशा ओसवाल, चंदा विराणी, गीता इसरानी, ईश्वरी गुलराजानी, जॅस्मिन मजेठिया, जेनिफर कोलते यांचा समावेश होता. या प्रसंगी संस्थापक ईश्वर कृपलानी, फाउंडेशनचे अध्यक्ष मनोहर फेरवानी, महिला विभागाच्या अध्यक्षा मीता शहा, मीना कृपलानी आदी उपस्थित होते.

‘कात्रज’तर्फे आरोग्य तपासणी शिबिर
पुणे, ता. ९ : पुणे जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाच्‍या वतीने महिला दिनानिमित्त महिला कर्मचाऱ्यांसाठी आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले. भारती हॉस्‍पिटलच्या सहकार्याने हा उपक्रम पार पडला. शिबिराचे उद्‍घाटन संघाच्या अध्यक्षा केशर पवार यांच्या हस्ते करण्यात आले. यामध्ये २२३ कर्मचाऱ्यांनी तपासणी करून घेतली. शिबिरापूर्वी संघातर्फे महिलांसाठी गुप्ते हॉस्पिटलच्या सहकाऱ्याने कर्करोग जनजागृती तपासणी शिबिर व मार्गदर्शन कार्यक्रमाचे आयोजन केले होते. या वेळी संघाचे व्यवस्थापकीय संचालक मनोज लिमये तसेच कर्मचारी व अधिकारी उपस्थित होते.

‘पर्वती नागरिक कृती’तर्फे पुरस्कार सोहळा
पुणे, ता. ९ : पर्वती नागरिक कृती समिती आणि पुणे सोशल ग्रुपतर्फे राजमाता जिजाऊ गौरव पुरस्कार सोहळ्याचे आयोजन केले होते. या प्रसंगी दत्तात्रेय कोहिनकर-पाटील, लिज्जत पापडचे संचालक सुरेश कोते, समितीचे अध्यक्ष राजेश शिंगाडे, रूपेश तुरे, ॲड. अभिषेक जगताप आदी उपस्थित होते. या वेळी विविध क्षेत्रांत विशेष कामगिरी करणाऱ्या महिलांचा या पुरस्काराने गौरव करण्यात आला.