जागतिक मूत्रपिंड दिनानिमित्त विशेष कार्यक्रम | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

जागतिक मूत्रपिंड दिनानिमित्त विशेष कार्यक्रम
जागतिक मूत्रपिंड दिनानिमित्त विशेष कार्यक्रम

जागतिक मूत्रपिंड दिनानिमित्त विशेष कार्यक्रम

sakal_logo
By

पुणे, ता. ९ ः जागतिक मूत्रपिंड दिनानिमित्ताने पूना हॉस्पिटल ॲण्ड रिसर्च सेंटरतर्फे मूत्रपिंड रुग्ण व त्यांचे नातेवाईक यांच्यासाठी विशेष कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. मूत्रपिंडरोग तज्ज्ञ डॉ. सुनील जावळे यांनी कार्यक्रमाच्या आयोजनासाठी प्रयत्न केले.

कार्यक्रमात मूत्रपिंड दान करणाऱ्यांचा सत्कार करण्यात आला. मूत्ररोगशल्यचिकित्सक डॉ. शिरीष भावे यांनी मूत्रपिंड दान करणाऱ्यांचे कौतुक करत मूत्रपिंडदानाचे महत्त्वही सांगितले. आपल्या प्रिय व्यक्तीसाठी मूत्रपिंड दान करणारे रुग्णांचे आई, वडील, बहीण, पत्नी, मावशी यांचाही या वेळी सत्कार करण्यात आला. मूत्रपिंडशस्त्रक्रिया झालेल्या रुग्णांनी व दान करणाऱ्यांनी या वेळी आपले अनुभव कथन केले. मूत्रपिंडरोग तज्ज्ञ डॉ. निखिल राठी यांनी काही प्रतिबंधात्मक उपाय व मूत्रपिंडरोग टाळण्यासाठी काय काळजी घ्यावी याची माहिती सांगितली. मूत्रपिंडरोग तज्ज्ञ डॉ. निरंजन आंबेकर यांनी रुग्ण दाता, डॉक्टर व हॉस्पिटल यांच्या समन्वयाने रुग्णास फायदा होतो हे नमूद केले. तसेच डायलिसिस घेणाऱ्या रुग्णांनीही व्यवस्थित काळजी घेणे, पथ्य पाळणे आवश्यक आहे असे सांगितले. पूना हॉस्पिटलचे वैद्यकीय संचालक लेफ्टनंट कर्नल डॉ. गिरीश देशमुख (निवृत्त) यांच्या हस्ते मूत्रपिंड दान करणाऱ्यांचा सत्कार करण्यात आला.