यशस्विता सिद्ध केलेल्या महिलांचा सत्कार | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

यशस्विता सिद्ध केलेल्या महिलांचा सत्कार
यशस्विता सिद्ध केलेल्या महिलांचा सत्कार

यशस्विता सिद्ध केलेल्या महिलांचा सत्कार

sakal_logo
By

पुणे, ता. ९ : जागतिक महिला दिनानिमित्त पुण्यातील लोकमान्य हॉस्पिटल फॉर स्पेशल सर्जरी व जेरिॲट्रिक वेलनेस फाउंडेशनच्या वतीने आयोजित कार्यक्रमात पुण्यातील वेगळी वाट निवडून यशस्विता सिद्ध केलेल्या महिलांचा सत्कार करण्यात आला. या प्रसंगी निवेदक सुधीर गाडगीळ, लोकमान्य रुग्णालयाच्या संचालिका डॉ. मिताली वैद्य, उपाध्यक्ष कॅप्टन हेमंत कुलकर्णी, स्त्रीरोग विभाग संचालक डॉ. मिता नाखरे, वैद्यकीय संचालक डॉ. श्रीकृष्ण जोशी आणि रत्नमाला वैद्य आदी उपस्थित होत्या.

जीवनात विविध प्रकारे कौटुंबिक संकटे आली असताना ती संघर्षाने परतावून लावून आपल्या स्वरा इतक्याच चिरतरुण असलेल्या आशा भोसले यांचा आदर्श महिलांनी घ्यावा. त्यांची आजपर्यंत २९ वेळा मुलाखत घेतली, पण प्रत्येकवेळी नवीन चैतन्य अनुभवता आल्याचे गाडगीळ यांनी सांगितले. केवळ माझ्या पत्नीने दिलेल्या पाठिंब्यामुळेच मी बोलण्याचा व्यवसाय करू शकलो, असे त्यांनी स्पष्ट केले.

डॉ. अनघा जोशी (प्राचार्या, इंदिरा कॉलेज), डॉ. गौरी दामले (मधुमेह तज्ज्ञ), डॉ. सुमेधा भोसले (स्टेट्स क्लब संचालिका), मेघना काटदरे (अथश्री ओल्ड एज् होम संचालिका), गौरी पाठारे (शास्त्रीय संगीत), केतकी काळे (नृत्य), मीना जगताप (उपायुक्त, सीआयडी), अश्विनी सातव व अश्विनी जाधव (पत्रकार) यांना गाडगीळ यांच्या हस्ते सन्मानित केले. या सन्मानप्राप्त महिलांना आपल्या प्रश्नांनी गाडगीळांनी बोलतं करून मैफील रंगवली. स्वप्नाली सोमवंशी यांनी प्रार्थना म्हटली. सोनिया गोगटे व रचना महाजन या दिव्यांग मुलींनी गणेशवंदनेवर नृत्य केले.