राजीव बर्वे यांना काव्य प्रतिभा पुरस्कार | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

राजीव बर्वे यांना काव्य प्रतिभा पुरस्कार
राजीव बर्वे यांना काव्य प्रतिभा पुरस्कार

राजीव बर्वे यांना काव्य प्रतिभा पुरस्कार

sakal_logo
By

पुणे, ता. १० ः रंगत संगत प्रतिष्ठानतर्फे यंदाचा ‘काव्य प्रतिभा पुरस्कार’ कवी, लेखक व प्रकाशक राजीव बर्वे यांना जाहीर झाला आहे. प्रतिष्ठानतर्फे दरवर्षी एका काव्यसंग्रहास किंवा कवितेच्या प्रांतात योगदान देणाऱ्या एका व्यक्तीस हा पुरस्कार दिला जातो. हा पुरस्कार बुधवारी (ता. १५) सायंकाळी ५.३० वाजता नवी पेठेतील पत्रकार भवन येथे होणाऱ्या कार्यक्रमात ज्येष्ठ कथाकार व अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष भारत सासणे यांच्या हस्ते प्रदान करण्यात येणार आहे. ज्येष्ठ संपादक भानू काळे आणि ज्येष्ठ कवी उद्धव कानडे यावेळी उपस्थित राहणार आहेत, अशी माहिती प्रतिष्ठानचे अध्यक्ष अ‍ॅड. प्रमोद आडकर यांनी निवेदनाद्वारे दिली.

व्हायोलिन वादकांचे आज स्नेहसंमेलन
पुणे, ता. १० ः गुरुवर्य बा. श. उपाध्ये यांच्या जन्मशताब्दीनिमित्त व उपाध्ये व्हायोलिन विद्यालयाच्या सत्तराव्या वर्षपूर्तीनिमित्त व्हायोलिन अकादमीतर्फे व्हायोलिन वादकांचे स्नेहसंमेलन आयोजित करण्यात आले आहे. शनिवारी (ता. ११) सायंकाळी पाच वाजता टिळक रस्त्यावरील न्यू इंग्लिश स्कूलच्या गणेश सभागृहात हा समारंभ होणार आहे. यावेळी उस्ताद फैयाज हुसैन खान आणि पं. रमाकांत परांजपे यांना जीवनगौरव पुरस्काराने गौरवण्यात येणार आहे. तसेच विविध शैली जोपासणाऱ्या गुणी व्हायोलिन वादक कलाकारांचा गौरवही करण्यात येणार आहे. हा कार्यक्रम सर्वांसाठी विनामूल्य खुला असीन रसिकांनी कार्यक्रमाचा आस्वाद घ्यावा, असे आवाहन ज्येष्ठ व्हायोलिन वादक पं. अतुलकुमार उपाध्ये यांनी केले आहे.