मसाप दिवाळी अंक 
स्पर्धेचा निकाल जाहीर

मसाप दिवाळी अंक स्पर्धेचा निकाल जाहीर

पुणे, ता. १० : ‘महाराष्ट्र साहित्य परिषद, पुणे’तर्फे २०२२ साठी घेण्यात आलेल्या दिवाळी अंक स्पर्धेचा निकाल नुकताच जाहीर करण्यात आला. यासाठी यंदा राज्यभरातून सुमारे १५० दिवाळी अंकांनी सहभाग घेतला होता. स्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभ सोमवारी (ता. १३) सायंकाळी ६ वाजता टिळक रस्त्यावरील मसापच्या माधवराव पटवर्धन सभागृहात ज्येष्ठ साहित्यिक राजन खान यांच्या हस्ते होणार आहे. ग्रंथालय विभागाचे कार्यवाह वि. दा. पिंगळे यांनी ही माहिती दिली.

यंदा ‘नवल’ या दिवाळी अंकाला ‘रत्नाकर पारितोषिक’, ‘शब्दमल्हार’ या दिवाळी अंकाला ‘विविध ज्ञानविस्तारकर्ते रावसाहेब मोरमकर पारितोषिक’, ‘उद्याचा मराठवाडा’ या दिवाळी अंकाला ‘मासिक मनोरंजनकार का. र. मित्र पारितोषिक’, ‘पुणे पोस्ट’ या दिवाळी अंकाला ‘शं. वा. किर्लोस्कर पारितोषिक’ आणि कै. विमल कचरू भालेराव स्मृतिप्रीत्यर्थ ऑनलाइन दिवाळी अंकाचे पारितोषिक ‘गीताई’ दिवाळी अंकाला जाहीर झाले. तसेच, उत्कृष्ट बालवाङ्मय पारितोषिक हे ‘जीवन शिक्षण’ या दिवाळी अंकाला, उत्कृष्ट कथेसाठीचे ‘दि. अ. सोनटक्के पारितोषिक’ संध्या सोळंखे-शिंदे यांच्या ‘माऊली’ या कथेला आणि उत्कृष्ट ललित लेखासाठीचे ‘अनंत काणेकर पारितोषिक’ सुरेश लोटलीकर यांच्या निःशब्द व्यंगचित्रांचा महर्षी’ या लेखाला मिळाले आहे. स्पर्धेसाठी परीक्षक म्हणून डॉ. अविनाश सांगोलेकर, अनिल गुंजाळ आणि डॉ. प्रतिमा जगताप यांनी काम पाहिले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com