सरस्वती फाउंडेशनच्या पुरस्कारांचे वितरण | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

सरस्वती फाउंडेशनच्या 
पुरस्कारांचे वितरण
सरस्वती फाउंडेशनच्या पुरस्कारांचे वितरण

सरस्वती फाउंडेशनच्या पुरस्कारांचे वितरण

sakal_logo
By

पुणे, ता. १० : सरस्वती एज्युकेशन फाउंडेशनच्या वतीने आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त विविध क्षेत्रातील सहा महिलांना ‘सरस्वती महिला रत्न पुरस्कार’ आणि राष्ट्रीय विज्ञान दिनानिमित्त ‘आदर्श शिक्षक पुरस्कार’ देऊन गौरविण्यात आले. महाराष्ट्र साहित्य परिषदेचे कार्यवाह वि. दा. पिंगळे यांच्या हस्ते या पुरस्कारांचे वितरण करण्यात आले.
कार्यक्रमात शास्त्री ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटचे अंशुल शर्मा, कवयित्री भाग्यश्री देसाई, उद्योजक संजय बराटे, दिलीप चौधरी, अशोक नकते, भूपेंद्रसिंग चौधरी उपस्थित होते. यावेळी भाग्यश्री देसाई, शोभा कुलकर्णी, अश्विनी जाधव, स्वाती पिंगळे, वृषाली महाजन, रजनी नकाते यांना ‘सरस्वती महिला रत्न पुरस्कारा’ने गौरविण्यात आले. तर मंगला धर्माधिकारी, वर्षा कुलकर्णी, विमल सोनवणे यांना ‘आदर्श शिक्षक पुरस्कार’ देऊन सन्मानित करण्यात आले. तसेच अकरा शिक्षकांचाही सत्कार करण्यात आला. शिवणे येथील इरा किड्स नर्सरी स्कूलच्या विद्यार्थ्यांनी ‘अतुलनीय भारत’ संकल्पनेवर आधारित कार्यक्रम यावेळी सादर केला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक संस्थेचे अध्यक्ष सुनील देसले यांनी तर सूत्रसंचालन शोभा कुलकर्णी, अश्विनी जाधव, धनश्री शर्मा यांनी केले. चेतना लोहार यांनी उपस्थितांचे आभार मानले.