Wed, June 7, 2023

सावित्रीबाई फुले पुणे
विद्यापीठाची आज अधिसभा
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाची आज अधिसभा
Published on : 10 March 2023, 12:03 pm
पुणे, ता. १० ः सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या नवनियुक्त अधिसभा सदस्यांची पहिली बैठक शनिवारी (ता. ११) आयोजित करण्यात आली आहे. विद्यापीठाच्या मुख्य इमारतीत ही सभा पार पडेल. यावेळी विद्यापीठाच्या अर्थसंकल्पाबरोबरच विविध प्रलंबीत प्रश्नांवर चर्चा होण्याची शक्यता आहे. प्रभारी कुलगुरू डॉ. कारभारी काळे यांच्या अध्यक्षतेखाली ही दुसरी अधिसभा असेल. तसेच प्राध्यापक, प्राचार्य, व्यवस्थापन आणि राज्यपाल नियुक्त सर्वच सदस्यांची ही पहिलीच अधिसभा असणार आहे. नवीन प्रस्ताव आणि ठरावही यावेळी मांडण्यात येतील. कोलमडलेले शैक्षणिक वेळापत्रक, प्राध्यापकांची रिक्त पदे आणि परीक्षांचा लांबलेल्या कालावधीबद्दल अधिसभेत वादळी चर्चा होण्याची शक्यता आहे.