Wed, June 7, 2023

पुणे वृत्तपत्र विक्रेता संघातर्फे शिवजयंती
पुणे वृत्तपत्र विक्रेता संघातर्फे शिवजयंती
Published on : 10 March 2023, 2:21 am
पुणे, ता. १० ः पुणे वृत्तपत्र विक्रेता संघाच्या क्वार्टरगेट विभागात शिवजयंती उत्साहात साजरी करण्यात आली. अध्यक्ष विजय पारगे म्हणाले, ‘‘शिवरायांच्या नीती मूल्यांवर विक्रेता संघ वाटचाल करत आहे. विक्रेत्यांचे हित जोपासत, त्यांचे आर्थिक उत्पन्न, समाजातील पत कशी वाढेल यासाठी संघटना प्रयत्नशील आहे.’’ कार्यक्रमाला सर्व वृत्तपत्र व्यवस्थापनाचे वितरण अधिकारी, वरिष्ठ उपाध्यक्ष दत्ता पिसे, कार्याध्यक्ष अनंता भिकुले, सचिव अरुण निवंगुणे, खजिनदार संजय भोसले, विश्वस्त संदीप शिंदे, संघटक मुकुंद वायकर, विश्वस्त, विभागप्रमुख उपस्थित होते. कार्यक्रमाचे नियोजन संघाच्या क्वार्टरगेट विभागातर्फे विभागप्रमुख संतोष बिडकर, योगेश उकिरडे, महेश जिंदम यांनी केले.
PNE23T29830