Sun, May 28, 2023

पार्टीची चौकशी करण्याची मागणी
पार्टीची चौकशी करण्याची मागणी
Published on : 10 March 2023, 4:03 am
पुणे, ता. १० : नगर रस्त्यावरील खांदवेनगर येथील महालक्ष्मी लॉन्स येथे झालेल्या एका पार्टीची चौकशी करून कारवाई करावी, अशी मागणी शिवसेनेने पोलिस आयुक्तांकडे केली आहे. ‘‘या पार्टीमध्ये १७-१८ वर्षांची मुले मोठ्या प्रमाणात सहभागी झाली होती. ती दारू पिऊन रस्त्यावरच दंगा करीत होती तसेच अश्लील चाळे करीत होती. त्यामुळे सुमारे चार ते पाच तास नगर रस्त्यावर वाहतुकीची कोंडी झाली होती. दहावीची परीक्षा सुरू असताना कोणाच्या वरदहस्ताने ही पार्टी सुरू होती, याचीही चौकशी करावी, तसेच या सर्व प्रकरणाची चौकशी करून दोषींवर कारवाई करावी,’’ अशी मागणी शिवसेनेचे उपशहरप्रमुख सुनील जाधव यांनी निवेदनाद्वारे पोलिस आयुक्तांकडे केली आहे.