हडपसर स्थानकावर आता महत्त्वाच्या रेल्वे गाड्यांना थांबा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

हडपसर स्थानकावर आता 
महत्त्वाच्या रेल्वे गाड्यांना थांबा
हडपसर स्थानकावर आता महत्त्वाच्या रेल्वे गाड्यांना थांबा

हडपसर स्थानकावर आता महत्त्वाच्या रेल्वे गाड्यांना थांबा

sakal_logo
By

पुणे, ता. ११ ः हडपसर रेल्वे स्थानकावर लवकरच पुण्याहून सुटणाऱ्या महत्त्वाच्या रेल्वेला थांबा दिला जाणार आहे. यात दानापूर, हुतात्मा एक्स्प्रेससह अन्य मेल एक्स्प्रेसचादेखील समावेश असणार आहे. ‘यार्ड रिमॉडेलिंग’च्या कामात काही रेल्वे गाड्या रद्द होतील, तेव्हा प्रवाशांना हडपसरसह अन्य छोट्या स्थानकांवरून गाड्या सुरू केल्या जाणार आहे. तत्पूर्वी प्रवाशांचा हडपसर स्थानकावरचा वावर वाढविण्यासाठी रेल्वे प्रशासन प्रयत्न करत आहे. हा त्याचाच भाग असल्याचे प्रशासनाने सांगितले.
रेल्वे प्रशासनाने पुणेऐवजी हडपसर स्थानकावरून सोलापूर, दौंडला जाणाऱ्या डेमू गाड्या सोडण्यास सुरुवात केली. हैदराबाद एक्स्प्रेसदेखील हडपसर येथूनच सुटत आहे. तीन रेल्वे गाड्या हडपसर स्थानकावरून सुटत असल्याने प्रवाशांची गर्दी वाढत आहे. येत्या काही दिवसांत हडपसर स्थानकावरून हुतात्मा एक्स्प्रेससह चार मेल एक्स्प्रेस गाड्यांना थांबा दिला जाणार आहे. तसा प्रस्ताव रेल्वे बोर्डाकडे पाठविला आहे. हडपसर रेल्वे टर्मिनलवर तीन प्लॅटफॉर्म उपलब्ध आहेत. त्यामुळे रेल्वे गाड्यांची संख्या जास्त असणार आहे. हडपसर, खराडी, वाघोली, मुंढवा या पूर्व भागात राहणाऱ्या आणि या मेल एक्स्प्रेसमधून प्रवास करणाऱ्यांना याचा फायदा होणार आहे.
दरम्यान, हडपसर स्थानकाचा विकास केला जाणार आहे. शिवाय काही महत्त्वाच्या रेल्वेनादेखील तिथे थांबा दिला जाणार आहे. यामुळे प्रवाशांची सोय होईल, असे विभागीय रेल्वे व्यवस्थापक इंदुरानी दुबे यांनी सांगितले.