अर्ध्या पगारावर काम करण्याची वेळ!

अर्ध्या पगारावर काम करण्याची वेळ!

पुणे, ता. १२ : चांगल्या पगाराची नोकरी मिळणार या आशेवर बड्या कंपनीत ट्रेनिंग घेतले. त्यानंतर तेथे अनेक दिवस इंटर्नशिप केली. त्या कामाच्या आधारावर अपेक्षित पगाराचे पॅकेज मिळाले. मात्र अनेक दिवस झाल्यानंतरही जॉर्इनिंग झाले नाही. त्यात आता कंपनी ऑफर लेटरमधील केवळ अर्धा पगार देण्यास तयार आहे, अशी स्थिती अनेक ‘आयटीयन्स’ची झाली आहे.
गेल्या सहा ते आठ महिन्यांपासून असा अनुभव अनेक आयटीयन्सला आला आहे. त्यामुळे अजून चांगल्या संधीची वाट पाहायची की मिळेल त्या पगारात नोकरी करायची अशा पेचात फ्रेशर असलेले आयटीयन्स पडले आहेत. ज्या आयटीयन्सला ऑफर लेटर दिले आहे, त्यांना नेमके कधी कामावर रुजू करून घेतले जाणार याबाबत देखील अद्याप काही निश्‍चित तारीख कळविण्यात आलेली नाही. त्यामुळे यावेळेत आपल्या प्रोफार्इलला सूट होर्इल, असे कमी कालावधीचे कोर्स करण्यास अनेकांनी सुरवात केली आहे. प्रामुख्याने १०० किंवा त्यापेक्षा जास्त कर्मचारी असलेल्या कंपन्यांमध्ये असे प्रकार होत आहेत.

अनुभवींनाही फटका
पहिल्यांदाच नोकरी करणाऱ्यांसह अनुभव असलेल्या आयटीयन्सला देखील याचा फटका बसत आहे. नवीन ठिकाणी जॉर्इन होण्यासाठी आत्ता कार्यरत असलेल्या कंपनीमध्ये राजीनामा दिलेल्यांची संख्या देखील मोठी आहे. मात्र नवीन कंपनीने रुजू करून न घेतल्याने त्यांची स्थिती अवघड झाली आहे. नोकरी नसल्याने पगार थांबला असून त्याचा परिणाम कुटुंबाच्या आर्थिक बाबींवर होत आहे. तसेच मनावर निर्माण झालेल्या दबावाचा सामना करावा लागत आहे.

ट्रेनिंग इंटर्नशिप पूर्ण झाल्यानंतर एका बड्या आयटी कंपनीत नव्याने जॉर्इन होत असलेल्या आयटीयन्सला साडेसहा लाख रुपयांचे ऑफर लेटर देण्यात आले. मात्र अनेक दिवस त्यांना जॉर्इन करून घेतले नाही. ऑफर लेटरला सहा महिने उलटल्यानंतर त्यांना अर्ध्या पगारावर रुजू होणार असेल तर लगेच जॉर्इन करून घेवू असे सांगण्यात आले. पर्याय नसल्याने अनेकांनी ती नोकरी स्वीकारली.
- हरप्रीत सलुजा, अध्यक्ष, नेसेन्ट इनफॉर्मेशन टेक्‍नॉलॉजी एम्प्लाईज सिनेट

मला एक फेब्रुवारी रोजी जॉर्इन होण्याबाबतचे ऑफर लेटर मिळाले होते. मात्र अद्याप जॉर्इन करून घेण्यात आलेले नाही. माझ्यासह मुलाखत दिलेल्या काहींना ऑफर लेटरच्या २० ते ५० टक्क्यांपर्यंत पगार कमी करून रुजू होण्याची सूचना करण्यात आली आहे.
- ऑफर लेटर मिळालेला आयटीयन

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com