Fri, March 24, 2023

ग्रॅव्हिटी ग्रुपतर्फे शंकर महाराज ट्रस्टला कार्डीॲक रुग्णवाहिका भेट
ग्रॅव्हिटी ग्रुपतर्फे शंकर महाराज ट्रस्टला कार्डीॲक रुग्णवाहिका भेट
Published on : 11 March 2023, 12:53 pm
पुणे, ता. ११ ः धनकवडी येथील श्री शंकर महाराज समाधी ट्रस्टला पुण्यातील युवा उद्योजक मिहीर कुलकर्णी यांच्या ग्रॅव्हिटी ग्रुपतर्फे व्हेंटिलेटर सहित वैद्यकीय उपकरणांनी सुसज्ज अशी कार्डीॲक रुग्णवाहिका देण्यात आली. पुण्याचे पोलिस आयुक्त रितेश कुमार यांच्या हस्ते रुग्णवाहिकेचे पूजन करून लोकार्पण करण्यात आले. यामुळे आता मठातील भाविक तसेच आसपासच्या परिसरातील नागरिकांना रुग्णवाहिकेचा लाभ घेता येणार आहे. या प्रसंगी मिहीर कुलकर्णी, पोलिस उपायुक्त स्मार्तना पाटील, सहायक धर्मादाय आयुक्त राहुल चव्हाण, रूबी हॉल क्लिनिकचे डॉ. संदीप करमरकर, नगरसेवक राजेंद्र शिळीमकर, विश्वस्त मंडळ प्रताप भोसले, सुरेंद्र वाईकर, सतीश कोकाटे आदी उपस्थित होते.