Thur, June 1, 2023

‘लॉयर्स’ सोसायटीच्या अध्यक्षपदी ॲड. शिंदे
‘लॉयर्स’ सोसायटीच्या अध्यक्षपदी ॲड. शिंदे
Published on : 11 March 2023, 5:40 am
पुणे, ता. ११ : दि. पुणे लॉयर्स कंझ्युमर्स को-ऑपरेटीव्ह सोसायटीच्या अध्यक्षपदी ॲड. कल्याण शिंदे यांची निवड झाली आहे. उपाध्यक्षपदी ॲड. रेखा करंडे-दांगट, सचिवपदी ॲड. अतिश लांडगे यांची आणि सहसचिवपदी ॲड. शरद शेळके यांची बिनविरोध निवड केली. हे सर्वजण युनिटी पॅनेलचे आहेत.
नुकत्याच पार पडलेल्या सोसायटीच्या निवडणुकीत १६ पैकी १४ संचालक युनिटी पॅनेलचे विजयी झाले होते. तर परिवर्तन पॅनेलचे दोन उमेदवार विजयी झाले आहेत. त्यानंतर शुक्रवारी (ता. १०) या पदाधिकाऱ्यांची निवड झाली. ही राज्यातील वकिलांची पहिलीच सोसायटी आहे. सोसायटीची वार्षिक उलाढाल सुमारे १२५ कोटी रुपयांची असून सात हजार ५०० भागधारक आहेत. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून संतोष धारणे, यशपाल मखरे, संजय पवार, ॲड. परेश धारणे, ॲड. मयूर शेळके यांनी निवडणुकीचे कामकाज पाहिले.