
मुथूट ग्रुप बातमी
सूचना - जाहिरात विभागाकडून आलेली ही बातमी सर्व आवृत्त्यांना आवश्यक आहे.
....................
मुथूट समूहाकडून
स्त्रीशक्तीचा गौरव
पुणे, ता. ११ : देशातील आघाडीच्या उद्योगसमूहांपैकी एक असलेल्या मुथूट समूहाने आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त स्त्रीशक्तीचा गौरव आगळ्या पद्धतीने केला. या समूहात एकूण ७,७६९ महिला विविध पदांवर कार्यरत आहेत आणि एकूण शाखांपैकी २४ टक्क्यांपेक्षा जास्त शाखांच्या प्रमुख महिला आहेत. अशा प्रकारे महिलांना योग्य ते स्थान आणि मान देऊन समूहाने महिलांबाबतचा आपला दृष्टिकोन दाखवून दिला आहे.
महिलांसाठी उत्कृष्ट असलेल्या ‘अवतार १०० कंपन्यां’मध्ये मुथूट समूहाचा समावेश आहे. ‘ग्रेट प्लेस टू वर्क इन्स्टिट्यूट’तर्फेही समूहाला प्रमाणित करण्यात आले आहे. प्रसिद्ध अभिनेत्री माधुरी दीक्षितला ब्रँड अँबेसेडर नेमूनही समूहाने महिला सबलीकरणाबाबतचा दृष्टिकोन दाखवून दिला आहे. कोचीमध्ये एक लाख मेन्स्ट्रुअल कप्सचे वितरण करण्यासारखे उपक्रम राबवूनही महिलांबाबतची सामाजिक दृष्टी दाखवण्यात आली आहे.
‘‘आमच्या समूहात महिलांसाठी अधिक संधी वाढवण्याबाबत आम्ही कटिबद्ध आहोत. महिलांच्या क्षमतांना योग्य व्यासपीठ उपलब्ध करण्याचे आमचे उद्दिष्ट आहे. भारतात पुरुष कर्मचाऱ्यांची संख्या जास्त असून, लिंगभाव निरपेक्षता आणि सर्वसमावेशकता वाढवणे गरजेचे आहे. त्यामुळे महिलांसाठी अधिक रोजगार संधी उपलब्ध करून बदल करण्याच्या प्रक्रियेसाठी आम्ही कटिबद्ध आहोत. या महिला दिनी आम्ही महिलांचे साहस आणि त्यांच्यातील करुणाभावाला सलाम करतो,’’ असे समूहाचे सहव्यवस्थापकीय संचालक अलेक्झांडर जॉर्ज मुथूट यांनी सांगितले.