Fri, June 9, 2023

पॉलिएटिव्ह केअर सेंटरमध्ये ‘हिंम्मत का तराना’ कार्यक्रम
पॉलिएटिव्ह केअर सेंटरमध्ये ‘हिंम्मत का तराना’ कार्यक्रम
Published on : 11 March 2023, 5:57 am
पुणे, ता. ११ ः सिप्ला फाउंडेशनच्या कर्करुग्णांसाठीच्या पॉलिएटिव्ह केअर सेंटरमध्ये ‘हिंम्मत का तराना’ हा गाण्यांतून सकारात्मकता जागवणारा कार्यक्रम गुरुकृपा संस्थेने नुकताच सादर केला. याप्रसंगी संजय मरळ, रुचिरा गुरव, रश्मी वसगडेकर, सनील कुलकर्णी यांनी वैविध्यपूर्ण गाणी गाऊन रुग्णांच्या आणि नातेवाइकांच्या मनावरील भार कमी करण्याचा प्रयत्न केला. सुजाता चौहान आणि गुरूकृपा संस्थेचे पुणे कार्यवाह प्रशांत थोरात यांनी सूत्रसंचालन केले. गुरुकृपा संस्थेचे अध्यक्ष पंकजनाथ महाराज यांच्या प्रेरणेने हा कार्यक्रम झाला.