Tue, June 6, 2023

‘पीबीए’तर्फे महिला दिनानिमित्त विविध कार्यक्रम उत्साहात
‘पीबीए’तर्फे महिला दिनानिमित्त विविध कार्यक्रम उत्साहात
Published on : 11 March 2023, 6:03 am
पुणे, ता. ११ : पुणे बार असोसिएशनतर्फे (पीबीए) जागतिक महिला दिनानिमित्त सुपर होम मिनिस्टरसह कॉमेडी तडका या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. जिल्हा व सत्र न्यायालयातील अशोका हॉलमध्ये हा कार्यक्रम पार पडला. या स्पर्धेमध्ये ॲड. स्नेहा ढसाळ (प्रथम क्रमांक), ॲड. भाग्यश्री मुळे (उपविजेत्या), ॲड. स्मिता भोसले, ॲड. आशा भोसले, ॲड. सुरेखा भोसले या महिला वकील विजेता ठरल्या. अनेक महिला वकीलांनी या स्पर्धेचा आनंद लुटला. ॲड. बिभीषण गदादे यांनी कार्यक्रमाचे निवेदन केले. पुणे बार असोसिएशनचे अध्यक्ष ॲड. केतन कोठावळे, उपाध्यक्ष ॲड. जयश्री बिडकर, ॲड. विश्वजीत पाटील, ॲड. राहुल कदम आदी उपस्थित होते.