कागदपत्रावर सही करण्यासाठी आरटीओ निरीक्षकाला मारहाण कागदपत्रावर सही करण्यासाठी एजंटची आरटीओ निरीक्षकाला मारहाण | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

कागदपत्रावर सही करण्यासाठी आरटीओ निरीक्षकाला मारहाण
कागदपत्रावर सही करण्यासाठी एजंटची आरटीओ निरीक्षकाला मारहाण
कागदपत्रावर सही करण्यासाठी आरटीओ निरीक्षकाला मारहाण कागदपत्रावर सही करण्यासाठी एजंटची आरटीओ निरीक्षकाला मारहाण

कागदपत्रावर सही करण्यासाठी आरटीओ निरीक्षकाला मारहाण कागदपत्रावर सही करण्यासाठी एजंटची आरटीओ निरीक्षकाला मारहाण

sakal_logo
By

पुणे, ता. ११ : कागदपत्रावर सही करण्यासाठी एका एजंटने गाडीचे कागदपत्र आरटीओ निरीक्षकाच्या अंगावर फेकून त्यांना मारहाण करून जीवे मारण्याची धमकी दिली. हा प्रकार फुलेनगर येथील प्रादेशिक परिवहन कार्यालयात शुक्रवारी दुपारी एक ते तीनच्या दरम्यान घडला.
या प्रकरणी मोटार वाहन निरीक्षक अभिजित गायकवाड (वय ३५) यांनी येरवडा पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यावरुन पोलिसांनी निकी फ्रान्सिस स्वामिनाथन (वय ३८, रा. फुलेनगर) याला अटक केली आहे. याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे त्यांच्या कार्यालयात शासकीय कर्तव्यावर असताना खासगी एजंट स्वामिनाथन हा त्यांच्या कार्यालयात आला. फिर्यादी यांच्या अंगावर गाडीचे पेपर फेकले. तसेच शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी देवून फिर्यादीचा गळा पकडून मारहाण केली.