
अवती भवती
राष्ट्रीय मराठी मोर्चा संघटनेची स्थापना
पुणे, ता. १२ ः राष्ट्रीय मराठी मोर्चा संघटनेची नुकतीच दिल्ली येथे स्थापना झाली आहे. दरम्यान या संघटनेची एक बैठक पुण्यात संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष आनंद रेखी यांच्या नेतृत्वाखाली पार पडली. यावेळी राष्ट्रीय उपाध्यक्ष डॉ. सुश्रुत सरदेशमुख, दिल्ली प्रदेशाध्यक्ष अतुल बोकरीया जैन, शिवाजी भागवत, संकेत खरपुडे आदी उपस्थित होते.
केशवसुत स्मृतिकरंडक स्पर्धा उत्साहात
पुणे, ता. १२ ः विद्यार्थी विकास मंडळ, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ आणि सरस्वती मंदिर नाईट कॉलेज ऑफ कॉमर्स अँड आर्ट्स यांच्या संयुक्त विद्यमाने ‘राज्यस्तरीय केशवसुत स्मृतिकरंडक’ स्वरचित काव्यवाचन स्पर्धा व काव्यवाचन कार्यशाळेचे आयोजन केले होते. यामध्ये प्रथम व द्वितीय क्रमांक सर परशुरामभाऊ महाविद्यालयाला मिळाले. तसेच तृतीय क्रमांक एस.एन.डी.टी कला व वाणिज्य महाविद्यालयाने पटकावले.
रणरागिणी समाजभूषण पुरस्कार सोहळा
पुणे, ता. १२ ः हेनेक्स सोशल वेल्फेअर फाउंडेशन आणि साजिर प्रतिष्ठानच्या वतीने महिला दिनानिमित्त रणरागिणी समाजभूषण पुरस्कार सोहळ्याचे आयोजन केले होते. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर, हेनेक्स ग्रुप ऑफ कंपनीजचे व्यवस्थापकीय संचालक विकास मस्के, राष्ट्रवादी काँग्रेसचे खडकवासला विधानसभा मतदार संघाचे अध्यक्ष काकासाहेब चव्हाण, साजिर प्रतिष्ठानचे अध्यक्ष पांडुरंग शेलार, सचिन धुकुडे आदी उपस्थित होते.