पीएमपी ठेकेदारांचा पुन्हा संप नको

पीएमपी ठेकेदारांचा पुन्हा संप नको

पुणे, ता. १२ ः बिलाची रक्कम वेळेत न मिळाल्याने पीएमपीच्या चार ठेकेदारांनी दोन दिवसांचा संप केला. याचा फटका आठ लाखांहून अधिक प्रवाशांना बसला. त्यामुळे असा संप पुन्हा भविष्यात होऊ नये, यासाठी दक्षता घ्यावी, असा आदेश पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी पीएमपी प्रशासनाला दिले.
पीएमपीच्या चार ठेकेदारांनी ९९ कोटी रुपयांचे बिल थकल्याने ५ व ६ मार्च रोजी संप केला. यात ९०७ बस सहभागी झाल्या होत्या. या पार्श्वभूमीवर पाटील यांच्या निवासस्थानी रविवारी बैठक पार पडली. या वेळी आमदार सिद्धार्थ शिरोळे, पीएमपीएमएलचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक ओमप्रकाश बकोरिया, पुणे महापालिकेचे आयुक्त डॉ. विक्रम कुमार, पिंपरी-चिंचवडचे आयुक्त शेखर सिंह, पीएमआरडीएचे आयुक्त राहुल रंजन महिवाल यांच्यासह पीएमपीएमएलचे प्रमुख ठेकेदार उपस्थित होते.

या मुद्द्यांवर झाली चर्चा...
- ठेकेदारांना ९९ कोटींपैकी ६६ कोटी रुपये दिले.
- जानेवारीचे बिल मार्च महिन्याच्या अखेरपर्यंत द्यावे.
- फेब्रुवारी आणि मार्च महिन्याचे बिल १५ एप्रिलपर्यंत द्यावे.
- पीएमपीची महिन्याला संचलनाची तूट १०७ कोटी इतकी आहे. महिन्याला ५० कोटीचे उत्पन्न तर तूट ५७ कोटीची आहे.
- संचलनाची तूट कमी करण्यासाठी प्रयत्न करणे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com