
सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात पुरस्काराचे वितरण
पुणे, ता. १२ ः हरित मित्र परिवार व गुरूकृपा संस्थेच्या वतीने सहकारमहर्षी भाऊसाहेब संतुजी थोरात पर्यावरण संवर्धन पुरस्काराने गौरविण्यात आले. यामध्ये कोल्हापूर परीक्षेत्रातील पोलिस अधिकारी सुनील फुलारी, महाराष्ट्र बांबू विकास मंडळाचे व्यवस्थापकीय संचालक एम. श्रीनिवासन राव, दंडकारण्य अभियान चळवळ, बाळासाहेब उंबरकर, प्रा. डॉ. तुकाराम शिंदे, डॉ. दयानंद पांडुरंग गोगले, मनोज टावरी, पातोंडा परिसर विकास संस्था, अनंत घरत, गौरी लागू, अशोक काळभोर, श्रीकृष्ण मंडळ ट्रस्ट, विकास म्हस्के, कुमारी सिद्धिका घुमरे यांना सन्मानित करण्यात आले. कार्यक्रमात हरित मित्र परिवाराचे अध्यक्ष डॉ. महेंद्र घागरे यांनी संस्थेची वाटचाल मांडली. स्वागताध्यक्ष म्हणून इंद्रजित बागल यांनी काम पाहिले. तर मंजूषा नरवाडकर आणि संजय मरळ यांनी गीतगायन केले. गुरूकृपा संस्थेचे कार्यवाह प्रशांत थोरात यांनी आभार प्रदर्शन केले तर संजय भुजबळ यांनी सूत्रसंचालन केले.