
रेल्वेच्या वेळांत बदल; काही गाड्या केल्या रद्द
पुणे, ता. १२ ः सोलापूर रेल्वे विभागातील दौंड-मनमाड विभागामध्ये ब्लॉक घेण्यात आल्याने पुण्याहून सुटणाऱ्या गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. तर काही गाड्यांचे मार्ग बदलण्यात आला आहे.
रद्द केलेल्या गाड्या
२१ ते २३ मार्च दरम्यान सुटणाऱ्या गाड्या : कोल्हापूर-गोंदिया महाराष्ट्र एक्स्प्रेस, नागपूर-पुणे एक्स्प्रेस, नांदेड-पुणे एक्स्प्रेस, दादर-साई नगर शिर्डी एक्स्प्रेस, गोंदिया-कोल्हापूर महाराष्ट्र एक्स्प्रेस, पुणे- नागपूर एक्स्प्रेस, नांदेड-पुणे-नांदेड एक्स्प्रेस, नागपूर-पुणे एक्स्प्रेस, दादर-साईनगर शिर्डी-दादर एक्स्प्रेस.
या गाड्यांच्या वेळेत बदल
- १३ व २० मार्च रोजी पुणे-जबलपूर एक्स्प्रेस दुपारी ३ वाजून २५ मिनिटांनी सुटेल.
- १४ व २१ मार्च रोजी पुणे-लखनौ एक्स्प्रेस, १५ व १९ मार्च रोजी पुणे-हटिया एक्स्प्रेस, १८ मार्च पुणे-गोरखपूर एक्स्प्रेस या गाड्या दुपारी ३ वाजून २५ मिनिटांनी सुटतील.
या गाड्यांचा मार्ग बदलला
- दानापूर-पुणे एक्स्प्रेस व हजरत निजामुद्दीन-वास्को गोवा एक्स्प्रेस इगतपुरी-पनवेल-लोणावळा मार्गे धावेल.
- जम्मूतावी-पुणे झेलम एक्स्प्रेस संत हिरदाराम नगर-रतलाम-वडोदरा-वसई रोड-लोणावळा मार्गे धावेल.
- हावडा-पुणे, पुणे-हावडा आजादहिंद एक्स्प्रेस, पुणे-हटिया एक्स्प्रेस ही गाडी दौंड-वाडी-सिकंदराबाद-बल्लारशाह- नागपूर मार्गे धावेल.
यशवंतपूर-हजरत निजामुद्दीन एक्स्प्रेस, यशवंतपूर-चंडीगड एक्स्प्रेस, पुणे-गोरखपूर एक्स्प्रेस या गाड्या कल्याण, मनमाड मार्गे धावेल.
-----------------