गणितातील गमतीजमतींमागची गुपिते

गणितातील गमतीजमतींमागची गुपिते

पुण्यातील दिलीप रावडे हे शिक्षक विद्यार्थ्यांना गणितात रमण्यासाठी विविध प्रयोग करत असतात. जन्मतारखेवरून वार सांगणे व मनातील संख्या ओळखणे, यांसारखी जादू ते मुलांना शिकवतात. गणिताचे अद्भुतरम्य प्रयोग करण्यासाठी ते नवनवीन मॉडेल्स मुलांना उपलब्ध करून देत असतात.

रावडे म्हणाले, ‘‘पाचवीतील विद्यार्थ्यांना जन्मतारखेवरून वार सांगायची युक्ती शिकवली. त्यांनी घरच्या, शेजारच्या व परिचितांच्या जन्मतारखेवरून त्या दिवशीचा वार सांगायचा सपाटा लावला. बघता-बघता ही मुले गणिताकडे ओढली गेली. आणखी नवीन प्रयोग शिकायची उत्सुकता त्यांच्यात निर्माण झाली. मनात धरलेली संख्या ओळखायची जादू शिकताना मुलांना दुप्पट, तिप्पट करणे व गुणाकार, भागाकार यांसारख्या गणितातील मूलभूत क्रियांचा हसत-खेळत सराव झाला. रमणबाग प्रशालेत आम्ही गणिताची प्रयोगशाळा उभारली असून तेथे जवळपास २२५ खेळ ठेवले आहेत. त्यांच्या माध्यमातून गणिताच्या विविध संकल्पना समजून घेणे सोपे जाते. गणितातील विविध क्रियांचा सराव होतो.’’
रावडे यांनी सांगितले की, १४ मार्च हा गणितातील पाय दिवस म्हणून साजरा केला जातो. आम्हीही या निमित्ताने सर्व भारतीय गणितज्ज्ञांची माहिती दर्शवणारी भित्तिपत्रके तयार केली आहेत. पायची संकल्पना व कृती सांगणारे तक्तेही केले आहेत. पाढे पाठ करण्यात मौज आणण्यासाठी आम्ही काही पद्धती शोधल्या आहेत. प्रसिद्ध गणितींनी वापरलेल्या निरनिराळ्या तंत्रांची माहिती आम्ही मुलांना करून देत असतो. काही वेळा आमचे विद्यार्थी मैदानावर गणिती आकृत्या रेखाटतात. भले मोठे वर्तुळ आखून त्याचा परीघ, व्यास, त्रिज्या वगैरे शोधून एकमेकांना सांगण्याचा खेळ माझे विद्यार्थी बरेचदा खेळतात.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com