एसटीच्या मालकीचे १३ पेट्रोलपंप सुरू | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

एसटीच्या मालकीचे १३ पेट्रोलपंप सुरू
एसटीच्या मालकीचे १३ पेट्रोलपंप सुरू

एसटीच्या मालकीचे १३ पेट्रोलपंप सुरू

sakal_logo
By

पुणे, ता. १४ ः राज्य परिवहन महामंडळाने स्वतःच्या मालकीचे पुणे विभागातील बंद झालेले १३ पेट्रोल पंप पुन्हा सुरू केले आहेत. त्यामुळे एसटी गाड्यांना आता खासगी पेट्रोलपंपावर जाण्याची गरज नाही. परिणामी प्रवाशांचा वेळ वाचेल, तर एसटीचे प्रतिलिटरमागे दोन ते अडीच रुपये वाचणार असून आर्थिक फायदा होणार आहे.
राज्य परिवहन महामंडळाच्या पुणे विभागात १३ पेट्रोल पंप असून, सुमारे ८०० एसटी गाड्यांना आता याच पंपावरून इंधनांचा पुरवठा केला जात आहे. याआधी एसटी गाड्यांना खासगी पंपावरून इंधन भरून घ्यावे लागत होते. त्यासाठी वेळदेखील लागत होता. शुक्रवारपासून पुन्हा हे पंप खुले झाले आहेत.
केंद्र सरकारने डिझेलवरील अनुदान बंद केले. त्यामुळे खासगी पंपांवरील डिझेलइतकाच दर एसटी महामंडळाला आकारण्यास येऊ लागला. पुणे विभागात सुमारे ८०० एसटी गाड्या असून दिवसाला सुमारे ५७ हजार लिटर लागते. एसटीने स्वतःचे पंप सुरू केल्याने खासगी पंपांवर मिळणाऱ्या पेट्रोलच्या तुलनेत कमी दराने ते उपलब्ध होऊ लागले. त्यामुळे आर्थिक बचत होत आहे. विभागीय वाहतूक अधिकारी कैलास पाटील म्हणाले, ‘‘एसटीने बंद असलेले पेट्रोलपंप पुन्हा सुरू केले आहेत. त्यामुळे गाड्यांना आता खासगी पंपांवर जावे लागणार नाही. यामुळे प्रवाशांचा वेळदेखील काही प्रमाणात वाचेल.