
काही प्रकल्पांना गती तर काही कागदावरच
पुणे, ता. १३ ः महापालिकेतील नगरसेवकांची मुदत संपल्यानंतर वर्षभरात मोठे प्रकल्प राबविणे, उत्पन्न वाढविणे यासाठी प्रयत्न केले जातील यासाठी २०२२-२३ च्या अर्थसंकल्पात तरतूद केली गेली. पण प्रशासकराज असतानाही त्यातील अनेक प्रकल्पांना वर्षभरात गतीच मिळाली नाही. हे प्रकल्प कागदावरच आहेत. तर काही मोठ्या प्रकल्पांना प्रशासक काळात गती मिळाली आहे.
मार्गी लागलेले प्रकल्प
- संगमवाडी ते बंडगार्डन आणि बंडगार्डन ते मुंढवा या ६२५ कोटी रुपयांच्या कामाला सुरवात
- जायका प्रकल्पासाठीचे अंतिम डिझाइन पूर्ण, जुने प्रकल्प पाडून टाकण्याचे काम पूर्ण, मलवाहनी टाकण्याचे काम सुरू
- भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी वैद्यकीय महाविद्यालयाच्या इमारतीचे भूमिपूजन
- गोल्फ क्लब चौकातील धर्मवीर छत्रपती शिवाजी महाराज उड्डाणपूल वाहतुकीसाठी खुला
कागदावर असलेले प्रकल्प
- सनसिटी ते कर्वेनगर मुठा नदीवर पूल, ठेकेदाराची निविदा रद्द
- करिष्मा सोसायटी ते कर्वे पुतळा उड्डाणपुलाबाबत काहीच प्रक्रिया नाही
- पाषाण-पंचवटी ते कोथरूडला जोडणाऱ्या बोगद्याचा डीपीआर सादर नाही
- खराडी बाह्यवळण येथील उड्डाणपुलाचा डीपीआर तयार; पण निविदा प्रक्रिया नाही
- विश्रांतवाडीतील उड्डाणपुलाचा विषय मंजूर नाही
- बालभारती ते पौडफाटा रस्त्याचा प्रकल्पाची निविदा प्रलंबित
- कात्रज-कोंढवा रस्त्याचा प्रकल्प भूसंपादनाशिवाय रखडला
- गंगाधाम चौकातील उड्डाणपुलाचे काम मंजूर; पण कामाला सुरवात नाही