‘ईपीएस-९५’ समितीकडून बुधवारी रास्ता रोको आंदोलन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

‘ईपीएस-९५’ समितीकडून बुधवारी रास्ता रोको आंदोलन
‘ईपीएस-९५’ समितीकडून बुधवारी रास्ता रोको आंदोलन

‘ईपीएस-९५’ समितीकडून बुधवारी रास्ता रोको आंदोलन

sakal_logo
By

पुणे, ता. १३ ः दरमहा किमान सात हजार पाचशे रुपये सेवानिवृत्ती वेतन व त्यावरील महागाई भत्ता मिळावा, वंचितांना योजनेत समाविष्ट करून त्यांना किमान पाच हजार रुपये सेवानिवृत्ती वेतन मिळावे, तसेच कुटुंबाला मोफत वैद्यकीय सुविधा मिळाव्यात आदी मागण्यांच्या पूर्ततेसाठी बुधवारी (ता. १५) रोजी सकाळी ११ वाजता अलका टॉकीज चौकात आणि पिंपरी-चिंचवड भागातील भक्ती-शक्ती येथे रास्ता रोको आंदोलन होणार असल्याची माहिती ईपीएस-९५ राष्ट्रीय संघर्ष समितीचे अध्यक्ष सतीश शिंदे यांनी दिली.
केंद्र सरकारला जाग आणण्यासाठी ईपीएस-९५ राष्ट्रीय संघर्ष समितीने देशभर २८ राज्यात प्रमुख २०० ठिकाणी एकाच दिवशी एकाच वेळी रास्ता रोको आंदोलन करण्याचे ठरवले. पुणे शहर तसेच पिंपरी-चिंचवड शहरातील विविध उद्योगधंदे, महामंडळ, सहकारी बँका, सहकारी संस्था, साखर कारखाने, विश्वस्त संस्था, औद्योगिक कंपन्या, एमआयडीसीतील अनेक उद्योग, हॉस्पिटल्स यांमधून सेवानिवृत्त झालेले पेन्शनधारक मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहेत, अशी माहिती शिंदे यांनी दिली.