
‘विद्यापीठ’ व ड्रोनआचार्य एरिअल इनोव्हेशन यांच्यात करार
पुणे, ता. १३ : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ आणि ड्रोनआचार्य एरिअल इनोव्हेशन्स यांच्यात सामंजस्य करार करण्यात आला आहे. ड्रोन तंत्रज्ञानावर आधारित अभ्यासक्रम सुरू करण्याच्या उद्देशाने हा करार करण्यात आला आहे.
यामध्ये ड्रोन पायलट प्रशिक्षण अभ्यासक्रमासोबातच ड्रोन बिल्डिंग, ड्रोन रिपेअरिंग आणि मेंटेनन्स, ड्रोन डेटा प्रोसेसिंग, ड्रोन्स फॉर डिझास्टर मॅनेजमेंट, कृषी नियोजनाकरीता ड्रोनचा वापर आणि पायथन कोडिंग अभ्यासक्रमांचा समावेश आहे. ‘ड्रोनआचार्य’चे संस्थापक आणि व्यवस्थापकीय संचालक प्रतीक श्रीवास्तव म्हणाले,‘‘ड्रोन व्यवसाय क्षेत्रात वाढलेली मागणी लक्षात घेऊन हा करार केला आहे. विविध प्रकारच्या उद्योगांमध्ये आणि शासकीय संस्थांमध्ये ‘ड्रोन’चा वापर आता अविभाज्य घटक बनला आहे. विशेषतः कुशल व्यावसायिकांची मागणी वाढल्याने ड्रोन संबंधित विशिष्ट प्रशिक्षण आणि शिक्षणाची गरज निर्माण झाली आहे.’’