Wed, June 7, 2023

सेवालाल महाराज जयंतीनिमित्त मेळावा
सेवालाल महाराज जयंतीनिमित्त मेळावा
Published on : 13 March 2023, 1:35 am
पुणे, ता. १३ ः राष्ट्रीय बंजारा क्रांती दलाच्या वतीने संत सेवालाल महाराज्य यांच्या २८४ व्या जयंतीनिमित्त महाप्रसाद आणि मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. कोंढवे-धावडे येथे झालेल्या या कार्यक्रमाप्रसंगी संत सेवालाल महाराजांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करत होम करण्यात आले. तसेच इतर कार्यक्रम पार पडले. या प्रसंगी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष मूर्ती जयराम राठोड, आमदार भीमराव तापकीर, माजी खासदार हरिभाऊ राठोड, हिमांशू जाधव, दशरथ चव्हाण, लक्ष्मण नाईक, मंगल पवार आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पिंपरी चिंचवड शहराध्यक्ष किसन राठोड आणि आभार प्रदर्शन चंद्रकांत राठोड यांनी केले.