
विद्यार्थ्यांसाठी चित्रकला स्पर्धा
पुणे, ता. १३ : जय गणेश व्यासपीठ पुणे शहर यांच्या वतीने शुक्रवार पेठेतील आदर्श विद्यालय मुलींच्या हायस्कूल, बुधवार पेठेतील नूतन भारत मराठी विद्यालय, भारत मराठी विद्यालय आणि सौ. सुशीलाबाई वीरकर हायस्कूल या शाळांमध्ये चित्रकला स्पर्धा घेण्यात आली. या स्पर्धेचे नियोजन पोटसुळ्या मारुती मंडळ, राष्ट्रीय साततोटी हौद मित्र मंडळ, व्यवहार आळी चौक मित्र मंडळ, विधायक मित्र मंडळ, श्री कालभैरवनाथ तरुण मंडळ, जय जवान मित्र मंडळ, श्री हनुमान मंडळ प्रतिष्ठान या मंडळांनी केले. या स्पर्धेत प्रत्येक शाळेत पहिले तीन क्रमांक काढण्यात आले. स्पर्धेसाठी आदर्श विद्यालय मुलींच्या हायस्कूलच्या मुख्याध्यापिका अनुजा देवभानकर, नूतन भारत मराठी विद्यालयाच्या प्रभारी मुख्याध्यापिका संध्या पांढरे, भारती मराठी विद्यालयाचे प्रभारी मुख्याध्यापक आर. एच. वाघुलकर आणि वीरकर हायस्कूलच्या मुख्याध्यापिका सविता बंगाळे यांचे मार्गदर्शन लाभले.