आरोग्य प्रमुखपदी 
डॉ. भगवान पवार

आरोग्य प्रमुखपदी डॉ. भगवान पवार

पुणे, ता. १३ : पुणे महापालिकेच्या आरोग्य प्रमुखपदाची सूत्रे डॉ. भगवान पवार यांनी सोमवारी स्वीकारली. डॉ. आशिष भारती यांच्या बदलीमुळे रिक्त झालेल्या या जागेवर डॉ. पवार यांची नियुक्ती राज्य सरकारने केली आहे.
डॉ. भारती यांच्या बदलीनंतर पुणे महापालिकेच्या आरोग्य प्रमुखपदाचा कार्यभार विभागातील उपआरोग्य प्रमुख डॉ. कल्पना बळीवंत यांच्याकडे देण्यात आला होता. आता डॉ. पवार यांनी या पदाची सूत्रे स्वीकारली. डॉ. पवार हे पुण्याचे जिल्हा आरोग्य अधिकारी होते. ते सार्वजनिक आरोग्य विभागातून सोमवारी कार्यमुक्त झाले. त्यानंतर त्यांनी महापालिकेच्या आरोग्य विभाग प्रमुखपदाची सूत्रे स्वीकारली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com