चायनीज सेंटर चालकाला रॉडने मारहाण | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

चायनीज सेंटर चालकाला रॉडने मारहाण
चायनीज सेंटर चालकाला रॉडने मारहाण

चायनीज सेंटर चालकाला रॉडने मारहाण

sakal_logo
By

पुणे, ता. १३ : शेजारी-शेजारी चायनीज सेंटर चालविणाऱ्या दोघांत झालेल्या वादातून एकाने दुसऱ्याला रॉडने बेदम मारहाण केली. तर कामगारांना शिवीगाळ केली. या प्रकरणी सिंहगड रस्ता पोलिस ठाण्यात नरेशकरण सिंह (वय ३४, रा. धायरी) यांनी तक्रार दिली. त्यानुसार, सत्यवान जाधव याच्यावर गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सत्यवान व नरेशकरण यांचे वडगाव बुद्रूक परिसरात शेजारी-शेजारी चायनीज सेंटर आहे. दरम्यान, सत्यवान हा त्यांना दरवेळी सेंटर बंद करण्यासाठी त्रास देत होता. त्याने तक्रारदारांच्या कामगारांना शिवीगाळ केली होती. त्याचा जाब विचारण्यासाठी तक्रारदार गेले असता त्याने वाद घालून त्यांना शिवीगाळ केली. तसेच, त्यांना रॉडने जबर मारहाण केली.