
‘आकाश बायजूज’च्या हडपसर केंद्राचे उद्घाटन
पुणे, ता. १४ : जेईई, नीट, विविध ऑलिम्पियाड यासाठी विद्यार्थ्यांना स्थानिक विद्यार्थ्यांना थेट हायब्रीड शिकवणीची सुविधा देण्यासाठी ‘आकाश बायजूज’ यांच्या वतीने हडपसर येथे नवीन क्लासरूम केंद्र सुरू करण्यात आले आहे. या केंद्राचे उद्घाटन ‘आकाश बायजूज’चे प्रादेशिक संचालक अमित सिंग राठोड यांच्या उपस्थित मंगळवारी झाले.
बालेवाडी, विमाननगर, कोथरूड, पिंपरी-चिंचवड आणि गोळीबार मैदान येथील केंद्रानंतर ‘आकाश बायजूज’चे हे पुण्यातील सहावे केंद्र हडपसरमध्ये सुरू झाले आहे. यानिमित्त आयोजित पत्रकार परिषदेत राठोड यांनी माहिती. या केंद्रात आठ वर्गखोल्या असून जवळपास हजार मुलांची क्षमता असणारे हे केंद्र आहे. उच्च शिक्षणातील स्वप्ने साकार करण्यासाठी विद्यार्थ्यांना विविध पातळ्यांवर केंद्रामार्फत मार्गदर्शन करण्यात येते.
अमित सिंग राठोड म्हणाले, ‘‘जेईई, नीट यांसह ऑलिम्पियाड आणि फाउंडेशन प्रोग्रॅमसाठी दरवर्षी तीन लाख ३० हजार विद्यार्थी थेट आणि ऑनलाइन वर्गखोल्यांद्वारे शिकण्याची सेवा घेतात. मोठ्या-मोठ्या शहरातील विद्यार्थ्यांच्या गरजांची पूर्तता करण्यासाठी नवीन केंद्र उभारली जात आहेत. ‘आकाश बायजूज’च्या केंद्रात विद्यार्थी इन्स्टंट ॲडमिशन कम स्कॉलरशिप टेस्टसाठी नाव नोंदणी करू शकतात. विद्यार्थ्यांसाठी वार्षिक शिष्यवृत्ती परीक्षा देखील घेण्यात येते. शिष्यवृत्ती परीक्षेतून पात्र ठरणाऱ्या विद्यार्थ्यांना निकषानुसार शुल्कांमध्ये विविध पातळ्यांवर सवलत दिली जाते. पुण्यातून दरवर्षी साधारणतः २५ हजार विद्यार्थी या शिष्यवृत्ती परीक्षेतून पात्र ठरतात. विद्यार्थ्यांना त्यांच्या घराजवळ केंद्र उपलब्ध करून देऊन जागतिक दर्जाचे कोचिंग देण्याच्या उद्देशाने नव्या केंद्राची सुरवात केली आहे.’’ तसेच विद्यार्थ्यांना त्यांच्या शाळांमध्येच कोचिंगची सुविधा मिळावी, यासाठी शहरातील काही शाळांसमवेत करार करण्यात आल्याचेही यानिमित्त राठोड यांनी सांगितले.
.