शिवजयंतीनिमित्त शिवसूर्य स्मरणिकेचे प्रकाशन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

शिवजयंतीनिमित्त शिवसूर्य स्मरणिकेचे प्रकाशन
शिवजयंतीनिमित्त शिवसूर्य स्मरणिकेचे प्रकाशन

शिवजयंतीनिमित्त शिवसूर्य स्मरणिकेचे प्रकाशन

sakal_logo
By

शिवजयंतीनिमित्त शिवसूर्य स्मरणिकेचे प्रकाशन
पुणे, ता. १४ ः देशाला स्वातंत्र्य मिळविण्याची प्रेरणा छत्रपती शिवाजी महाराज यांच्याकडून मिळाली. मध्ययुगातील महापराक्रमी लोकांमुळे देश जिवंत राहिला आणि संत परंपरेमुळे संस्कृती टिकून राहिली. त्यामुळे वारकरी व धारकरी यांच्या मिलनातून आधुनिक भारताची निर्मिती होईल, असे मत भारत इतिहास संशोधक मंडळाचे अध्यक्ष प्रदीप रावत यांनी व्यक्त केले. गुरुवार पेठेतील प्रभात मित्र मंडळातर्फे शिवजयंतीनिमित्त शिवसूर्य स्मरणिकेचे प्रकाशन करण्यात आले, त्या वेळी ते बोलत होते. याप्रसंगी परिमंडळ १ चे पोलिस उपायुक्त संदीपसिंह गिल, मंडळाचे अध्यक्ष किशोर चव्हाण, उत्सवप्रमुख ओंकार नाईक, अविनाश निरगुडे, मंगेश शिंदे आदी उपस्थित होते. यावेळी मंडळातर्फे महिलांसाठी झालेल्या स्पर्धांचे पारितोषिक वितरण झाले. किशोर चव्हाण यांनी प्रास्ताविक केले. नीलेश कांबळे यांनी सूत्रसंचालन केले.

कऱ्हाडे ब्राह्मण संघातर्फे जागतिक महिला दिन साजरा
पुणे, ता. १४ ः कऱ्हाडे ब्राह्मण संघातर्फे पहिल्यांदाच जागतिक महिला दिन साजरा करण्यात आला. यावेळी माजी वरिष्ठ पोलिस निरीक्षक
रेखा खंडकर-साळुंखे यांचे ‘सायबर गुन्हे आणि सामाजिक सुरक्षा’ व आहारतज्ज्ञ सुकेशा सातवळेकर यांचे ‘आजच्या गतिमान जीवनात आहारमान’ या विषयावर व्याख्यान झाले. संघाच्या अध्यक्षा मुक्ता चांदोरकर यांनी प्रास्ताविक केले. कर्तृत्ववान आणि विशेष कामगिरी केलेल्या अद्वैता उमराणीकर, विष्णुप्रिया शेवडे, अमृता चांदोरकर, विनिता श्रोत्री, विनया देसाई या महिलांचे सत्कार करण्यात आले. याप्रसंगी संघाचे बळवंत भाटवडेकर, गणेश गुर्जर, गिरीश शेवडे, डॉ. अरुण हळबे आदी उपस्थित होते.

माधवनाथ महाराजांचा नाथषष्ठी उत्सव साजरा
पुणे, ता. १४ ः रविवार पेठेतील श्री सद्गुरू माधवनाथ महाराज गादी येथे नाथषष्ठीचा उत्सव उत्साहात साजरा करण्यात आला. सकाळी ८ ते १० या वेळेत लघुरुद्र, त्यानंतर गीता पाठ वाचन, महाआरती व त्यानंतर महाप्रसादाचे वाटप करण्यात आले. दिवसभर भक्तांनी दर्शनासाठी गर्दी केली होती. महाआरतीवेळी शिरीष मोहिते उपस्थित होते.