Thur, June 1, 2023

महिला पोलिसांची आरोग्य तपासणी
महिला पोलिसांची आरोग्य तपासणी
Published on : 14 March 2023, 1:52 am
पुणे, ता. १४ : समवेदना संस्थेने महिला पोलिस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांबरोबरच त्यांच्या कुटुंबातील स्त्रियांची कर्करोग पूर्वनिदान तपासणी मोफत केली. समवेदना संस्थेच्या स्त्री कर्करोग पूर्वनिदान तपासणी उपक्रमांतर्गत ही तपासणी करण्यात आली. पोलिस आयुक्त रितेश कुमार यांच्या परवानगीने हा उपक्रम राबविला. यात संस्थेच्या नियामक मंडळाचे सदस्य आणि पुणे पोलिस विघ्नहर्ता न्यासाचे विश्वस्त, ज्येष्ठ पत्रकार राजीव साबडे यांचे सहकार्य मिळाले. तसेच, परिमंडळ एकचे उपायुक्त संदीपसिंह गिल आणि परिमंडळ दोनच्या उपायुक्त स्मार्थना पाटील या परिमंडळातही शिबिर घेण्यात आले.